Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Groundnut Sowing : भुईमुगाची पेरणी सातशे हेक्टरवर

Rabi Sowing : खानदेशात भुईमुगाची पेरणी सुरू झाली असून, यंदा क्षेत्र ७०० हेक्टरवर स्थिर राहील, असे संकेत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात भुईमुगाची पेरणी सुरू झाली असून, यंदा क्षेत्र ७०० हेक्टरवर स्थिर राहील, असे संकेत आहेत. सर्वाधिक पेरणी चोपडा (जि. जळगाव) तालुक्यात होण्याची शक्यता आहे.

भुईमुगासाठी खानदेशातील सातपुडा पर्वतालगतचा भाग प्रसिद्ध आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा, शहादा, नवापूर व अक्कलकुवा या भागांत भुईमुगाची पेरणी अधिकची केली जाते. खानदेशात मध्यंतरी भुईमुगाची पेरणी घटली होती. ही पेरणी फक्त ४०० ते ४५० हेक्टरवर मर्यादित होती.

कारण पाऊसमान तीन वर्षांपूर्वी कमी होते. तसेच दरांबाबतही समाधानकारक स्थिती नव्हती. परंतु चांगला पाऊस व कोविडनंतर दरातील स्थैर्य यामुळे शेतकरी भुईमुगाची पेरणी किंवा लागवड करू लागले.

यंदा कमी पावसामुळे लागवड वाढणार नाही, असे सांगण्यात आले. अलीकडे जळगाव जिल्ह्यात जामनेर, पाचोरा भागांतही पेरणी होऊ लागली आहे. मागील दोन वर्षे तेलबियावर्गीय पिकांचे दर स्थिर आहेत.

यात भुईमुगासही पाच हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर सरासरी मिळाला आहे. तसेच एकरी सात ते आठ क्विंटल शेंगांचे (वाळविलेल्या) उत्पादन अनेकांनी घेतले आहे. काही शेतकऱ्यांनी विक्री १० ते १२ क्विंटल उत्पादनदेखील घेतले.

मका, गहू आदी पिकांच्या तुलनेत भुईमूग परवडल्याने शेतकरी या पिकास पसंती देत आहेत. मागील दोन वर्षे क्षेत्र सातत्याने वाढले. परंतु यंदा पाऊसमान कमी राहीले आहे. कमी पावसामुळे कृत्रीम जलस्रोत कमी आहेत.

यामुळे क्षेत्रात फारशी वाढ होणार नाही. क्षेत्र स्थिर राहील, असे संकेत असून, एकूण ७०० हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे ३५० हेक्टर, धुळ्यात सुमारे १८० हेक्टरवर आणि नंदुरबारात सुमारे १५० ते १६० हेक्टरवर भुईमुगाची लागवड होऊ शकते.

पेरणी सुरू

खानदेशात भुईमुगाची पेरणी सुरू झाली असून, अनेक शेतकरी ठिबक व तुषार सिंचनाच्या मदतीने सिंचन करीत आहेत. यामुळे पाणी कमी लागत असून, पीकस्थिती सध्या बरी आहे. मागील महिन्यातही काही शेतकऱ्यांनी आगाप पेरणी केली आहे. लागवडीसाठी शेतकरी मध्यम, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Purandar Drought Condition: पुरंदर तालुक्यात दुष्काळाचे संकट; २३ हजार ६८४ हेक्टर क्षेत्र बाधित

Kharif Crop Damage: मावळमध्ये खरीप पिकांचे मोठे नुकसान; भात, सोयाबीन, भुईमुगाला ७० ते ८० टक्के फटका

Agricultural Infrastructure: शेतीमाल मूल्यवर्धनासाठी अत्याधुनिक सुविधांवर भर; नवीन गोदामे, शीतगृहे आणि विकिरण केंद्रे उभारणार: पणनमंत्री जयकुमार रावल

Sugarcane Farm Fire: पेटत्या उसात शिरून २५ एकर ऊस वाचविला

Sugarcane Price Dispute: सांगली जिल्ह्यात रात्री ऊस वाहतूक रोखण्यास सुरुवात; ऊसदराचा तिढा कायम; शेतकरी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT