Groundnut  Agrowon
ॲग्रो विशेष

Groundnut Harvesting : भुईमूग काढणीला सुरुवात

Groundnut Cultivation : अनेकांनी जानेवारीत लागवड केली आहे. या महिन्यात लागवड केलेले भुईमूग पीक अजून काढणीवर आलेले नाही. या महिन्याच्या अखेरिस या पिकात काढणी सुरू होईल, असे दिसत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात भुईमूग काढणीला सुरुवात झाली आहे. काही भागात आगाप लागवडीच्या पिकात काढणी पूर्ण झाल्याची स्थिती आहे. भुईमुगाची लागवड खानदेशात डिसेंबरमध्ये झाली होती. कमी कालावधीच्या वाणांना अनेकांनी पसंती दिली. आगाप लागवड खानदेशात जळगातील चोपडा, यावल, जामनेर, पाचोरा, अमळनेर, भडगाव, चाळीसगाव आदी भागांत झाली होती.

धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा, शहादा व नवापुरातही आगाप भुईमूग पीक होते. या पिकात काढणी याच आठवड्यात सुरू झाली आहे. अनेकांनी जानेवारीत लागवड केली आहे. या महिन्यात लागवड केलेले भुईमूग पीक अजून काढणीवर आलेले नाही. या महिन्याच्या अखेरिस या पिकात काढणी सुरू होईल, असे दिसत आहे.

उशिरा लागवडीच्या भुईमूग पिकात शेंगा पक्व होत आहेत. परंतु त्या काढणीवर आलेल्या नाहीत. खानदेशात यंदा भुईमुगाची लागवड अपक्षेपेक्षा अधिक झाली आहे. ही लागवड जळगाव जिल्ह्यात सुमारे दोन हजार हेक्टरवर, धुळ्यात ११०० हेक्टरवर, तर नंदुरबारात सुमारे ८०० हेक्टरवर झाली होती.

अनेकांनी गहू, मका पीक टाळून भुईमूग लागवड केली. त्यासाठी सुधारित, संकरित वाणांचा उपयोग अधिकाधिक झाला . यंदा काही वाणांचा तुटवडा होता. परंतु शेतकऱ्यांनी अन्य भागात जाऊन, संपर्कांचा उपयोग करून वाण उपलब्ध करून घेतले. अनेकांनी ठिबक, तुषार सिंचनाच्या मदतीने सिंचन केले आहे. काळ्या कसदार जमिनीत अधिकची लागवड झाली आहे. सातपुडा व सातमाळालगतचा भाग भुईमुगासाठी प्रसिद्ध आहे. पीक काही दिवस लवकर पक्व होईल.

मजूरटंचाईचा प्रश्‍न

भुईमूग काढणीसह सध्या कांदा काढणी, बाजरी, ज्वारीची कापणी, मळणीची कामे सुरू आहेत. बागायती पिकांत तणनियंत्रण, खते देणे आदी कामेही सुरू आहेत. एकाच वेळी अनेक कामे सुरू असल्याने मजूरटंचाई तयार झाली आहे. याचा फटका भुईमूग काढणीला बसत आहे. शेतकरी अन्य गावांतून मजूर आणून आपली कामे करून घेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Crop: आंबा उत्पादनात ५० टक्के घट होण्याचा अंदाज

Maize Farmers: मका उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

Cotton Purchase: हमीभावाचा आधार नाही; कापूस गेला कमी दरात

Animal Market Action: लकडगंजमधील वन्यजीवांच्या बेकायदा बाजारावर होणार कारवाई

Natural Farming: नांदेडला डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाला गती

SCROLL FOR NEXT