Summer Groundnut: उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र यंदा २८ हजार हेक्टरने वाढले

Groundnut Production: राज्यात यंदा उन्हाळी पिकांची गतवर्षीपेक्षा एक लाख सात हजार हेक्टरने क्षेत्र वाढले आहे. त्यात २८ हजार हेक्टरने उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र वाढले असून, यंदा ८३ हजार ४८४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
Groundnut Farming
Groundnut FarmingAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News: राज्यात यंदा उन्हाळी पिकांची गतवर्षीपेक्षा एक लाख सात हजार हेक्टरने क्षेत्र वाढले आहे. त्यात २८ हजार हेक्टरने उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र वाढले असून, यंदा ८३ हजार ४८४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. उन्हाळी भात, मका, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सूर्यफूल, तीळ यांसह अन्य पिकांची पेरणी सरासरी पेक्षा अधिक आहे.

Groundnut Farming
Groundnut Harvesting : खानदेशात भुईमूग पीक येतेय काढणीवर

राज्यात उन्हाळी पिकांचे ३ लाख ४९ हजार ७५९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा आतापर्यंत ४ लाख ५ हजार ३४१ हेक्टरवर (सरासरीच्या १३६ टक्के) पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी उन्हाळी पिकांची २ लाख ९८ हजार ७३० हेक्टरवर पेरणी झाली होती. त्या तुलनेत यंदा १ लाख ७ हजार हेक्टरवर अधिक पेरणी झाली आहे. यंदाही राज्यातील बहुतांश भागात पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत.

मात्र धरणाच्या कार्यक्षेत्रात पाणी उपलब्धता आहे, तेथे शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके घेण्याला प्राधान्य दिले आहे. उन्हाळी कांद्याचीही यंदा अधिक प्रमाणात लागवड झाली आहे. गेल्या वर्षभरात भुईमूग शेंगांना बाजारात चांगली मागणी आणि दर चांगला राहिला. त्यामुळे यंदा उन्हाळी भुईमूग पेरणीला शेतकऱ्यांनी अधिक पसंती दिल्याचे दिसत आहे. यंदा ८३ हजार ४८४ हेक्टरवर पेरणी झाली.

Groundnut Farming
Groundnut Crop : खानदेशात भुईमूग पीक जोमात; पेरणी क्षेत्रात वाढ

त्यात २८ हजार हेक्टरने उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र वाढले आहे. सर्वाधिक यवतमाळ, हिंगोलीला अधिक भुईमुगाचे क्षेत्र आहे. याशिवाय उन्हाळी भाताची १ लाख ४० हजार हेक्टर, मक्याची ७४,६०९ हेक्टर, ज्वारीची २६,९८३ हेक्टर, बाजरीची ३१ हजार ३२४, मुगाची ११ हजार ३२५, सूर्यफुलाचे ४ हजार ३१९ हेक्टर, तिळाची २५ हजार ६७७, सोयाबीनची ३८८७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

जिल्हानिहाय उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र (हेक्टर) नाशिक २६५०, धुळे २०७७, नंदुरबार ः १८५१, जळगाव : २५०८, अहिल्यानगर ः ५२६५, पुणे ः ३८४२, सोलापुर ः २८०४, सातारा ः ३०५०, लातुर ः १८७३, धाराशिव ः १५२३, नांदेड ः ६९४०, परभणी ः ६०२५, हिंगोली ः ९५७०, बुलडाणा ः ३४४७, अकोला ः ४३५५, वाशीम ः ४४२९, अमरावती ः ३९५३, यवतमाळ ः १००३९.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com