Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : हिरवा चारा-पाण्याचा प्रश्न सुटला

Team Agrowon

Jalgaon News : यंदा ओल्या दुष्काळामुळे खरिपातील पिकांची स्थिती बिकट आहे. परंतु अनेक प्रकल्पांत जलसाठा मुबलक आहे. तसेच माळरानासह शिवारातही हिरवा चारा मुबलक आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना यंदा दिलासा मिळणार आहे.

पावसामुळे मका, बाजरी व इतर पिके खराब झाली आहेत. परंतु चारा हाती येईल, अशी स्थिती आहे. मागील वेळेस दुष्काळामुळे शिवारात पिके करपल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पुरेसा चाराही लागला नाही, यामुळे महाग चारा घ्यावा लागला होता. तसेच टंचाईदेखील होती. खानदेशात मागील पावसाळ्यात कमी पाऊस होता. वार्षिक सरासरीच्या ८१.०५ टक्के इतका पाऊस झाला.

मध्यम व लघू प्रकल्पांमध्ये सरासरी कमी जलसाठा उन्हाळ्यात होता. पाण्यासाठी अनेक विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. धुळ्यातील शिंदखेडा, धुळे, साक्री, जळगावातील चाळीसगाव, अमळनेर, बोदवड आदी भागांत स्थिती गंभीर होती.

धुळे, साक्री, शिरपूर या तीन तालुक्यांतील एकूण २८ महसूल मंडलांत दुष्काळसदृश परिस्थिती होती. पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला सतत बैठका व नियोजन करावे लागले. परंतु यंदा पाऊसमान चांगले आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण सरासरीच्या १२८ टक्के पाऊस झाला आहे. धुळ्यातही पाऊसमान ११५ टक्क्यांवर आहे. नंदुरबारमध्येही पावसाने सरासरी ओलांडली आहे.

टँकरचीही दरवाढ थांबणार

ग्रामीण भागात सद्यःस्थितीला जनावरांना चाऱ्यासह पाणीही मुबलक आहे. मागील वेळेस पावसाळ्यानंतर लागलीच भीषण टंचाई जाणवली होती. चारा सर्वत्र उपलब्ध असून, स्थानिक भागासह अन्य जिल्ह्यातही तो मुबलक असल्याने तो सहज खरेदी करून आणणे शक्य आहे. पाणीही मुबलक आहे. टँकरद्वारे पाणी आणण्याची वेळ यंदा फारशी येणार नाही. मागील वेळेस उन्हाळ्यात पाच हजार लिटरच्या टँकरसाठी पंधराशे रुपये खर्च करावे लागत होते.

पुरेसा चारा

सध्या चारा पुरेसा उपलब्ध आहे. तसेच पाण्याची समस्याही दूर झाली आहे. दिवसभरात गायीला सरासरी ४० किलो चारा लागतो. तसेच म्हशीला सरासरी ५० किलो चारा लागतो. चारा दर आवाक्यात आहेत. त्यावरील खर्च कमी झाला आहे. अनेक शेतकरी मुरघास बॅगमध्ये हिरव्या चाऱ्याचे तुकडे करून साठवित आहेत. एक, तीन व पाच टनांची एक बॅग चारा साठवणुकीसाठी वापरली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tripartite Committee : आचारसंहितेपूर्वी त्रिपक्ष समिती स्थापन करा

Buldana Urban Warehouse : ‘बुलडाणा अर्बन’ने तयार केली नऊ लाख टन क्षमतेची साठवणूक क्षमता

Monsoon Retreat : मॉन्सून दमदार बरसला हंगामात राज्यात २६ टक्के अधिक पाऊस

Post-Monsoon Season : मॉन्सूनोत्तर हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

Banana Farming : केळी लागवड वाढण्याचे संकेत

SCROLL FOR NEXT