Water Storage : लातुरातील आठपैकी दोनच मध्यम प्रकल्प भरले

Latur Water Stock : पावसाळा संपत आला तरी लातूर तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पात केवळ २० टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Latur News : जिल्ह्याच्या दृष्टीने आठ मध्यम प्रकल्प महत्त्वाचे आहेत. यापैकी केवळ दोनच मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्यात चार मध्यम प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी उपयुक्त पाणीसाठा आहे.

पावसाळा संपत आला तरी लातूर तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पात केवळ २० टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे. हे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

Water Storage
Water Storage : नांदेडला मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा वाढला

चार प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी ५० टक्के म्हणजे चार मध्यम प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी उपयुक्त पाणीसाठा आहे.

Water Storage
Jayakawadi Water Storage : जायकवाडीचा पाणीसाठा स्थिर; प्रकल्प जवळपास तुडुंबच

यात तावरजा २०.५० टक्के, देवर्जन ४८.९६ टक्के, साकोळ ४५.१२ टक्के, मसलगा ४३.५५ टक्के पाणीसाठा आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही.

जिल्ह्यात १११ टक्के पाऊस

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ७२५.१ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या १११ टक्के पाऊस झाला आहे. तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे - लातूर ६७७ (१०७ टक्के), औसा ६९१ (१२३), अहमदपूर ८८९ (१२७), निलंगा ६७० (११०), उदगीर ७३२ (११२), चाकूर ७७० (१०८), रेणापूर ८०३(१२८), देवणी ६६२ (११०), शिरूर अनंतपाळ ६०७ (९७), जळकोट ७७३ (११५), सरासरी ७२५(१११). आकड्यात पाऊस मोठा दिसत असला तरी मध्यम प्रकल्पात मात्र अपेक्षित पाणी आलेले नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com