Dragon Fruit Workshop
Dragon Fruit Workshop  Agrowon
ॲग्रो विशेष

Dragon Fruit Farming : ड्रॅगन फळशेती कार्यशाळेला बारामतीत उत्तम प्रतिसाद

गणेश कोरे

Baramati News : ड्रॅगन फ्रूट शेतीची भूरळ आता भारतातील शेतकऱ्यांना पडू लागली आहे. इतर देशांच्या तुलनेत ड्रॅगन फ्रूट शेतीची यशस्वी लागवड आपल्याकडे केली जात आहे. या फळाला देशांतर्गत तसेच परदेशातही मागणी आहे.

त्यापासून जॅम, जेली, ज्युस, वाईन प्रक्रियेच्या संधीसुद्धा उपलब्ध आहेत. या पिकाची उत्पादकता कशी वाढवावी व गुणवत्तेचे उत्पादन कसे मिळवावे, याचे अद्ययावत ज्ञान शेतकऱ्यांना देण्यासाठी बारामतीमधील एनआयएएसएम संस्थेमधील शास्त्रज्ञांनी पुढाकार घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. १९) बारामतीमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय ड्रॅगन फळशेती कार्यशाळेला महत्त्व प्राप्त झाले होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था (एनआयएएसएम) आणि ‘सकाळ -अॅग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसी यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित केली होती.

कार्यशाळेचे उद्‌घाटन एनआयएएसएम संस्थेचे संचालक डॉ. के. एस. रेड्डी यांच्या हस्ते झाले. एनआयएएसएमचे शास्त्रज्ञ डॉ. गोरक्ष वाकचौरे, एसआयआयएलसीचे सहसरव्यवस्थापक अमोल बिरारी, तसेच पुणे, अमरावती, लातूर, सातारा, धाराशिव, रत्नागिरी, नगर, सांगली, माळशिरस, कोल्हापूर आदी भागांतील शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान, डॉ. रेड्डी, डॉ. वाकचौरे, शास्त्रज्ञ डॉ. विजयसिंह काकडे, डॉ. वनिता साळुंखे, डॉ. राजकुमार यांनीही ड्रॅगन फ्रूट बद्दल माहिती दिली. एसआयआयएलसी संस्थेचे व्यवस्थापक अमित मांजरे, समन्वयक स्वप्निल अविनाशे यांनी कार्यशाळा यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. प्रास्ताविक अमोल बिरारी यांनी केले. सूत्रसंचालन जया चौधरी यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Session 2024 : मुसळधार पावसाचा अधिवेशनाला फटका; आमदारांसह मंत्र्यांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

Tax on Robot : यंत्रमानवांवर कर आकारण्याचा इरादा

Nilesh Lanke Protest : विखेंच्या आश्वासन, लंकेंचं आंदोलन स्थगित; जयंत पाटलांच्या मध्यस्तीनंतर निर्णय

Indian Politics : दोघांमधील संघर्षाला अवास्तव महत्त्व

Maize Market : मक्यातील विक्रमी तेजी टिकून राहणार का?

SCROLL FOR NEXT