Grape Pruning Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Cultivation : द्राक्ष फळछाटणीला पाणीटंचाईचे ग्रहण ; हंगाम लांबण्याची शक्यता

Grape Pruning : सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी यंदाची फळछाटणी उपलब्ध पाण्यावर केली आहे. सध्या ३० टक्के फळछाटणी पूर्ण झाली आहे.

Abhijeet Dake

Sangli News : सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी यंदाची फळछाटणी उपलब्ध पाण्यावर केली आहे. सध्या ३० टक्के फळछाटणी पूर्ण झाली आहे. परंतु शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यंदा पाण्याची कमतरता भासत असल्याने फळ छाटणीच्या प्रारंभापासूनच पाणी टंचाईचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक संकटात सापडला आहे.

जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र सुमारे १ लाख ५० हजार एकरांवर आहे. गेल्या चार महिन्यांत अवघा ५० टक्के पाऊस झाला आहे. परिणामी, भूजल पातळी वाढली नाही. त्यातच पाणीटंचाई कमी करण्यासाठी म्हैसाळ, टेंभू आणि ताकारी योजना सुरू केल्याने या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर फळछाटणीचे नियोजन सुरु केले. ऑगस्टपासूनच फळछाटणी सुरू आहे. सुमारे ३० टक्के क्षेत्रावर फळ छाटणी झाली आहे. सध्या योजनांमुळे पाणीटंचाई फारशी जाणवत नसली तरी, पुरेसा पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दुष्काळी भागात छाटणी लवकर

जत तालुक्यासह आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यांत दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात फळ छाटणी केली जाते. परंतु पाण्याची समस्या मोठी आहे. पावसाची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे यंदाच्या हंगामात दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी १५ ते २० दिवस अगोदर म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून फळछाटणीस प्रारंभ केला आहे.

आगाप फळछाटणी ऑगस्टपासून सुरू झाली आहे. म्हैसाळ, टेंभू, आणि ताकारी योजनेच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सध्यातरी पाण्याची कमतरता नाही. पण पुढे पाण्याची कमतरता भासेल.
- चंद्रकांत लांडगे, द्राक्ष उत्पादक, मजेराजुरी, ता. तासगाव, जि. सांगली
दरवर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून फळछाटणी सुरू होते. परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे यंदा फळछाटणी लवकर सुरू केली असली, तरी आतापासून पाणी कमी आहे. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
- विठ्ठल चव्हाण, द्राक्ष उत्पादक, उमदी, ता. जत, जि. सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Crops: डाळिंबावर विविध रोगांचा प्रादुर्भाव; केंद्रीय कृषिमंत्र्यांकडून गंभीर दखल, तज्ज्ञांचे पथक शेतकऱ्यांच्या मदतीला

Automated Weather Station : हवामान केंद्रे ९९६ ग्रामपंचायतींत उभारणार

Banana Plantation : खानदेशात केळी लागवडीस गती

Sugarcane FRP : ऊस उत्पादकांना एफआरपीबाबत अपेक्षा

Rabi Season Aid: रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १० हजारांची मदत जाहीर

SCROLL FOR NEXT