Agrowon Grape Expo : द्राक्ष हंगामात छाटणी सुरू ठेऊन सूक्ष्मनियोजन आवश्यक

Grape Farming : सध्या ऑक्टोबर छाटणीची कामे सुरू झाली आहेत. मात्र, अद्यापही काही ठिकाणी समाधानकारक पाऊस नाही. अशा परिस्थितीत छाटण्या थांबवून चालणार नाही; तर छाटण्या वेळेत पूर्ण करून तसे नियोजन उपलब्ध पाण्यावर करणे आवश्यक आहे.
Agrowon Grape Expo
Agrowon Grape ExpoAgrowon

Nashik News : सध्या ऑक्टोबर छाटणीची कामे सुरू झाली आहेत. मात्र, अद्यापही काही ठिकाणी समाधानकारक पाऊस नाही. अशा परिस्थितीत छाटण्या थांबवून चालणार नाही; तर छाटण्या वेळेत पूर्ण करून तसे नियोजन उपलब्ध पाण्यावर करणे आवश्यक आहे.त्यानुसार चालू द्राक्ष हंगामात सूक्ष्म नियोजन केल्यास अडचणी येणार नाहीत, असा सल्ला राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुंवर यांनी दिला.

नाशिक शहरात ‘ॲग्रोवन एक्सक्लूझिव्ह ग्रेप एक्स्पो-२०२३’चे आयोजन ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान आयोजन करण्यात आले होते.समारोपाच्या दिवशी आयोजित ‘कॅनॉपी व्यवस्थापन’या विषयावर तांत्रिक चर्चासत्रात डॉ. सोमकुंवर बोलत होते.

डॉ. सोमकुंवर म्हणाले की, पाण्याच्या उपलब्धतेनुसार आगामी काळात द्राक्ष छाटणी करून उत्पादन घेण्याकडे कल असावा त्यानुसार लोड मॅनेजमेंट हा महत्त्वाचा भाग आहे. यासह आच्छादन वापरावे.

छाटणीनंतर पुढील अवस्थेत कॅनॉपीच्या गर्दीमुळे बागेत आर्द्रता वाढल्यास ‘डाऊनी मिल्ड्यू’ रोगासाठी पोषक वातावरण बनते. परिणामी फवारणी केल्यानंतर रोग नियंत्रण सहज शक्य होत नाही. त्यामुळे रोग नियंत्रणाच्या दृष्टीने बागेमध्ये कॅनॉपी व्यवस्थापन गरजेचे आहे. त्यासाठी काडीनुसार पानांची संख्या मर्यादित ठेऊन हवा खेळती ठेवावी.

Agrowon Grape Expo
Agrowon Grape Expo : ‘द्राक्ष उत्पादनात प्रतिबंधात्मक उपायांवर भर महत्त्वाचा’

देशातून होणाऱ्या फळ निर्यातीत ५० टक्क्यांहून अधिक वाटा द्राक्ष पिकाचा आहे. मात्र एकूण उत्पादनाच्या तुलनेत अवघी ८ ते १० टक्के ही निर्यात होते. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या वाणाची गरज आहे. त्या वाणांची आता उपलब्धता व लागवड काळाची गरज आहे. छाटणीनंतर वाढीच्या अवस्थेत शाखीय वाढ, घडनिर्मिती व काडी पक्वता यासाठी पाणी, अन्नद्रव्य, कीड-रोग व्यवस्थापन व सूर्यप्रकाशाचे नियोजन महत्त्वाचे असते. नसल्यास घड जिरण्याची समस्या भेडसावते. त्यामुळे फळ छानणीनंतर बागेत घडांची संख्या निश्चित करावी.

व्यावसायिक दृष्टिकोनातून द्राक्ष शेतीकडे पाहा ः मोरे

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (ता.निफाड) येथील प्रगतिशील द्राक्ष उत्पादक शेतकरी गणेश मोरे यांनी द्राक्ष शेतीच्या गेल्या वीस वर्षांचा अनुभव शेतकऱ्यांसमोर मांडला. त्यांनी ‘नवीन द्राक्ष वाण व जागतिक बाजारपेठेतील संधी’ या विषयावर माहिती दिली. या वेळी ते म्हणाले, जागतिक बाजारपेठ ओळखून पेरू, चिली या द्राक्ष उत्पादक देशात लागवड करण्यापूर्वी जमिनीची रासायनिक, भौतिक परिस्थिती जमिनीचा प्रकार, पाणी धरण्याची क्षमता याच्या परीक्षणानुसार लक्ष देऊनच लागवड केली जाते.

Agrowon Grape Expo
Agrowon Grape Expo : द्राक्ष तंत्रज्ञान अनुभविण्याची आज प्रदर्शनात शेवटची संधी

मात्र या बाबत आपल्याकडे दुर्लक्ष केले जाते. जसं इमारतीचा पाया भक्कम असेल त्यानुसार लागवड करताना सर्व शास्त्रीय पद्धती व कामकाज यांचा अवलंब गरजेचं आहे. या द्राक्ष उत्पादक देशांच्या तुलनेत आपल्याकडे सकारात्मक वातावरण आहे, मात्र असे असतानाही द्राक्ष उत्पादनात मागे पडतो हे शोधण्याची गरज आहे.

इजिप्तमध्ये गेल्या काही वर्षांत द्राक्ष लागवडी झाल्या; मात्र त्यांच्या निर्यातीचा टक्का आपल्यापेक्षा अधिक आहे ही चिंतनाची बाब आहे. याचे शेतकऱ्यांनी आत्मचिंतन करावे. त्यात आपल्या देशात जवळपास १,७०० कंटेनर द्राक्ष आयात होऊन त्यास ४०० रुपये किलोपर्यंत मॉलमध्ये दर मिळतो आहे.

याचा लाभ का घेत नाहीत, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. द्राक्ष लागवडी वाढूनही ग्राहक संख्या वाढू शकलो नाही ही खंत आहे. भारतात सध्या ४१ द्राक्षवाण नोंदणीकृत आहेत. त्यापैकी २१ देशात लागवडीखाली आल्या आहेत. त्यामुळे खत, सिंचन, कॅनॉपी व्यवस्थापन यानुसार काम करावे लागेल. आता व्यावसायिक दृष्टिकोनातून द्राक्ष शेतीकडे पाहण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com