Tax Collection
Tax Collection Agrowon
ॲग्रो विशेष

Tax Collection : साताऱ्यातील ग्रामपंचायत कर वसुली निम्म्यावरच

हेमंत पवार

Karad News : सातारा जिल्ह्यातील एक हजार ४९६ ग्रामपंचायतींच्या मागील थकित आणि यंदाच्या अशा एकूण १४४ कोटी ९७ लाख ७३ हजार २६ रुपये कर वसुलीपैकी यंदा फक्त ७८ कोटी ३३ लाख ५० हजार ४९६ रुपयेच वसुल झाले आहेत. त्याची सरासरी ५६ टक्क्यांवरच आहे. कर वसुलीची ३१ मार्च ही अंतिम तारीख आहे. त्याला एकच दिवस राहिला आहे. तरीही वसुलीची टक्केवारी ही कमी असल्याने गावात सोयी-सुविधा मिळण्यावर मर्यादा येणार आहेत.

जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांकडील विस्तार अधिकाऱ्यांची संख्या तोकडी आहे. एका-एका विस्तार अधिकाऱ्यांवर अनेक गावांचा भार आहे. जिल्ह्यातील गावे एक हजार ४९६ आणि विस्तार अधिकारी फक्त ४२ अशी स्थिती आहे. त्यातच तीन ते चार ग्रामपंचायतीचा कारभार एका ग्रामसेवकांकडे आहे. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाचाही फटका ग्रामपंचायत कर वसुलीला बसला आहे. पंचायत समितीची यंत्रणाही लोकसभा निवडणूक कामात गुंतली आहे. त्याचाही परिणाम ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर झाला आहे.

जिल्ह्यात एक हजार ४९६ ग्रामपंचायती आहेत. त्यांची मागील वर्षाची कराची थकबाकी ४८ कोटी २० लाख ९९ हजार ७०५ रुपये आहे. तर यंदाची वसुलीची रक्कम ९६ कोटी ७८ लाख ८८ हजार ८३१ रुपये आहे. त्यानुसार एकूण वसुलीची रक्कम १४४ कोटी ९७ लाख ७३ हजार २६ रुपये आहे. त्यातील फक्त ७८ कोटी ३३ लाख ५० हजार ४९६ वसुल झाले आहेत. त्यामुळे उर्वरित ६६ कोटी ६४ लाख २२ हजार ५२७ रुपये वसूल करावे लागतील.

कर वसुली थकण्याची कारणे

महागाईमुळेही ग्रामस्थांना आर्थिक टंचाई

कारखान्यांकडून उसाचा दुसरा हप्ता मिळालेली नाही

पाणीटंचाईची भीषणता वाढल्याने पिके धोक्यात

शेतीमाल हाती लागणार नसल्याने अर्थचक्र ठप्प

हातावर पोट असणाऱ्यांचे हाल

सोसायट्यांचे कर्ज भरण्यास प्राधान्य

तालुका ग्रामपंचायती कर वसुली (टक्के)

सातारा १९२ ५०.३६

कोरेगाव १४२ ४०.५९

खटाव १३४ ५६.२७

माण ९५ ५४.१४

फलटण १३१ ४९.६४

खंडाळा ६३ ५६.२७

वाई ९९ ५५.४२

जावळी १२५ ६८.७२

महाबळेश्‍वर ७९ ५७.७९

कऱ्हाड २०१ ५८.५१

पाटण २३२ ५४.९१

एकूण १४९६ ५४.०३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT