Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चांगली थंडी पडली असल्यामुळे आंबा बहरला आहे. उरल्यासुरल्या झाडांनाही चांगला मोहर आला असून, या वर्षी चांगले उत्पादन येईल, असे चित्र सद्यःस्थितीत दिसत आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. एकाच टप्प्यात अधिकतर आंबा परिपक्व होऊन १५ मार्चनंतर या वर्षीचा आंबा हंगाम सुरू होईल, अशी शक्यता आहे..वातावरणातील बदल आणि विविध किडरोगांमुळे मागील दोन-तीन वर्षे आंबा उत्पादकांसाठी कठीण गेली. फळमाशी आणि फुलकिड्यांमुळे आंबा बागायतदार गेली दोन वर्षे प्रचंड हैराण झाले होते. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या वर्षी देखील लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील आंबा हंगामासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ८ नोव्हेंबरपर्यंत पाऊस होता. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये मोहोरलेल्या झाडांची संख्या नगण्य होती. पावसामुळे झाडांना मोहराऐवजी पालवी येण्याची शक्यता निर्माण झाली होती..Mango Crop Disease: आंबा पिकावरील ‘लीफ वेबर’ .परंतु १४ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते आतापर्यंत जिल्ह्यात चांगली थंडी आहे. किमान तापमान ९ ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत टिकून आहे. त्याचा चांगला परिणाम आता दिसून येत आहे. जिल्ह्यात न मोहरलेल्या आंब्याच्या झाडांना आता मोहोर फुटला आहे. ७० ते ७५ टक्के झाडे मोहराने बहरली आहेत. त्यामुळे आंबा उत्पादकांमध्ये असलेली संभ्रमावस्था दूर झाली आहे. आंबा उत्पादकांनी देखील बागांच्या व्यवस्थापनावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. कीड-रोगांचे प्रमाण देखील तुलनेने कमी आहे. सद्यःस्थितीतील हवामान उत्पादनासाठी पोषक मानले जात आहे..Mango Farmers Subsidy : आंध्र प्रदेश सरकारने आंबा उत्पादकांना दिले १८४ कोटी रुपयांचे अनुदान; मुख्यमंत्री नायडू यांचा दावा.थंडीमुळे ९० टक्के झाडांना चांगला मोहर आला आहे. दोन-तीन दिवस वगळता आंबा पिकाला चांगले हवामान राहिले आहे. पहिल्या टप्प्यात किरकोळ मोहर आला होता. तो आंबा मार्चच्या पहिल्या टप्प्यात किरकोळ स्वरूपात येईल. परंतु १५ मार्चनंतरच खऱ्या अर्थाने आंबा हंगाम सुरू होईल.बाळा मुळम, पुरळ-कळंबी, ता. देवगड.गेले २० ते २५ दिवस जिल्ह्यात चांगली थंडी आहे. त्यामुळे आंबा, काजू पिकांना चांगला मोहर आला आहे. मोहर संरक्षणासाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशक, बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी. याशिवाय इतर व्यवस्थापन देखील काटेकोर करावे.डॉ. यशवंत मुठाळ, तांत्रिक अधिकारी, ग्रामीण मौसम सेवा केंद्र, मुळदे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.