Tax Collection : दुष्काळातही ग्रामपंचायतींकडून करवसुली सुरूच

Drought Update : खानदेशातील सुमारे १८०० ग्रामपंचायतींची थकबाकी यंदाही वाढली असून, वसुलीस प्रतिसाद नाही.
Tax
TaxAgrowon

Jalgaon News : खानदेशातील सुमारे १८०० ग्रामपंचायतींची थकबाकी यंदाही वाढली असून, वसुलीस प्रतिसाद नाही. दुष्काळी स्थितीने अडचणी असून, वसुलीतून सर्वत्र सूट मिळावी, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

बँका जशी वसुली करीत आहेत, तशीच वसुली सध्या ग्रामपंचायती विविध करांसंबंधी करीत आहेत. परंतु ही थकबाकी वसुली मोहीम अनेक दिवस राबवूनही वसुलीस प्रतिसाद मिळालेला नाही. मोठी थकबाकी असून, हा आकडा खानदेशात एकूण ६० कोटींवर आहे. जळगाव, धुळे व नंदुरबारात पावसाची तूट होती.

Tax
Sangli Drought Condition : २०११ च्या जनगणनेनुसार दुष्काळी भागात पाणी पुरवठा, मंत्री दखल घेणार का?

परतीचा पाऊस कुठेही आला नाही. काही भागात सप्टेंबरमध्ये पाऊस होता. परंतु जून व ऑगस्टमधील पावसाने पिकहानी झाली. सर्वत्र दुष्काळी स्थिती आहे. शेतमालास दर नव्हते. ९७ टक्के कापसाची विक्री ६५०० ते ६८०० रुपये प्रतिक्विंटल या दरात झाली आहे. कापूस खानदेशात प्रमुख पीक असून, १४ लाख हेक्टरपैकी तब्बल नऊ लाख हेक्टरवर कापूस पीक असते. कापसातून नफा आला नाही. रब्बीही जेमतेम आहे.

ज्यांनी ज्वारी, हरभरा पेरणी केली, त्यांचे उत्पादन कमी आले आहे. अशात वित्तीय स्थिती सर्वत्र कोलमडली आहे. अशात दुष्काळी तालुक्यांत प्रशासनाने सवलती लागू केल्या असून, त्यात मोफत शिक्षण, कर्जवसुलीस स्थगिती व अन्य सवलतींचा समावेश आहे. अशातही ग्रामपंचायती वसुली करीत आहेत.

Tax
Drought Condition : नागपूर जिल्ह्यातील पाच महसुली मंडलांत दुष्काळसदृश परिस्थिती घोषित

ही वसुली बंद करण्याची मागणीदेखील ग्रामस्थ व अन्य जागरूक नागरिक करीत आहेत. दुसरीकडे वसुली होत नसल्याने दिवाबत्ती, पाणीपुरवठा व अन्य कार्यवाहीसंबंधीचा निधी ग्रामपंचायतींना अपुरा पडत आहे. यात शासनाने ग्रामपंचायतींना निधी द्यावा, खास बाब म्हणून त्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणीदेखील केली जात आहे.

लोकअदालतीतही प्रतिसाद नाही

मध्यंतरी जळगावात राष्ट्रीय लोकअदालतीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या थकबाकीदारांच्या ३ हजार १३० प्रकरणांपैकी ६९ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाले, त्यातून २२ लाख ५७ हजार रुपये वसुल करण्यात आले. ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणी पट्टीच्या थकबाकीदारांचे एकूण १ हजार ७ प्रकरण होते, मात्र एकाही प्रकरणात वसुली किंवा तडजोडीला प्रतिसाद मिळाला नाही. याच कार्यवाहीत बँका, वित्तीय संस्थांसह बी.एस.एन.एल, वीज वितरण कंपनीच्या दाखल पूर्व २ हजार ७२९ प्रकरणांपैकी २१ प्रकरणांचा निपटारा होऊन १५ लाख १९ हजार ३२१ रुपये वसुल झाले. एकूण ६९ खटले निकाली, दिवाणी,फौजदारी व वित्तीय संस्थांचे २२.५७ लाखाचा वसुल झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com