Pune News: राज्यातील रब्बी हंगामातील पेरण्यात अंतिम टप्प्यात आल्या आहेत. यंदा दमदार पाऊसमानामुळे रब्बीत चक्क मका पिकाने गहू, हरभरा या प्रमुख पिकांना मागे टाकले आहे. राज्यात आतापर्यंत ९२ टक्के रब्बी पेरण्या झाल्या असून सरासरी क्षेत्राच्या तुलनेत मक्याने सर्वाधिक १२४ टक्क्यांपर्यंत, तर सूर्यफुलाने सर्वांत कमी १२ टक्केच मजल मारल्याचे, कृषी विभागाने दिलेल्या अहवाल स्पष्ट करण्यात आले आहे. .राज्यात रब्बी हंगामाचे सरासरी ५७ लाख ८० हजार ४१७ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी २२ डिसंबरपर्यंत ५२ लाख ९७ हजार ५१९ हेक्टर क्षेत्रावर (९२ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच काळात ५५ लाख ४४ हजार ६९३ हेक्टर क्षेत्रावर (९६ टक्के) पेरण्या झाल्या होत्या..Rabi Season: सिंधुदुर्गात रब्बीच्या क्षेत्रात ९५० हेक्टरने घट.यंदा पाऊसमान लांबल्यामुळे पेरण्यांनाही उशीर झाला आहे. विभागनिहाय क्षेत्रात सर्वात कमी कोकण ७१.१८ टक्के, तर सर्वाधिक लातूर विभागात लातूर १०३.१९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. इतर विभागात नाशिक ८९.९६ टक्के, पुणे ८४.०१ टक्के, कोल्हापूर ९३.७७ टक्के, छत्रपती संभाजीनगर ९०.८४ टक्के, अमरावती ८९.३१ टक्के, नागपूर ८०.८० टक्के पेरण्या झाल्या आहेत..सध्या रब्बी हंगामातील पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ज्वारीच्या ८० टक्के, गहू ८८ टक्के, मका १२४ टक्के, हरभरा ९६ टक्के, इतर कडधान्य १०३ टक्के, करडई ७९ टक्के, जवस ३७ टक्के, तीळ ३८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मक्याचे सरासरी क्षेत्र ३ लाख ७५ हजार १७० हेक्टर असून, २२ डिसेंबरपर्यंत ४ लाख ६३ हजार ९७८ हेक्टर म्हणजे तब्बल ८८ हजार ८०८ हेक्टर (१२४ टक्के)ने यात वाढ नोंदली गेली आहे. कडब्यासह धान्याचा उपयोग इतर पिकांपेक्षा अधिक सुरक्षितता या कारणांमुळे मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे..Rabi Sowing: देशात रब्बी पेरणी क्षेत्रात आठ लाख हेक्टरने वाढ .तर सूर्यफुलाचे सरासरी क्षेत्र ६४०३ हेक्टर असताना आत्तापर्यंत केवळ ७९८ हेक्टर क्षेत्रा(१२ टक्के)वरच पेरणी झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. तेलबिया म्हणून कधीकाळी सूर्यफूल हे रब्बी आणि उन्हाळी हंगामातील महत्त्वाचे पीक होते, मात्र यंदा वाढलेल्या पावसामुळे नगदी पिकांकडे शेतकरी वळल्याचा दिसून येतो..रब्बीची सद्य:स्थिती...ज्वारी पीक वाढीच्या ते पोटरीच्या अवस्थेत, काही भागात अमेरिकन लष्करी अळी, खोड किडीचा अल्प प्रादुर्भावगहू पीक वाढीच्या तर मुकुट मुळे फुटण्याच्या अवस्थेतमका पीक वाढीच्या अवस्थेत, काही ठिकाणी अमेरिकन लष्करी अळीचा अल्प प्रादुर्भावहरभरा पीक वाढीसह फांद्या फुटण्याच्या अवस्थेत. काही भागात गोगलगाय, ‘मर’चा प्रादुर्भावकरडई, सूर्यफूल, तीळ पिके रोप ते वाढीच्या अवस्थेत.खरिपातील तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीसह मर रोगाचा अल्प प्रादुर्भाव.रब्बी पिके पेरणीस्थिती (हेक्टरमध्ये)पिके सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र* (टक्के)ज्वारी १४,९५,७९२ ११९९६०२ (८०)गहू ११,८०,६५१ १०,३७,१७५ (८८)मका ३,७५,१७० ४,६३,९७८ (१२४)इतर तृणधान्य १४,५४८ १०,५१० (७२)हरभरा २५,१६,६२७ २४,१५,३६७ (९६)इतर कडधान्य १,२७,५५२ १,३१,५५८ (१०३)करडई ३०,५२१ २४,११७ (७९)जवस ७,२२५ २,७०१ (३७)तीळ २,०९३ ८०४ (३८)सूर्यफूल ६,४०३ ७९८ (१२)इतर तेलबिया २३,८३५ १०,९०९ (४६)स्रोत : कृषी विभाग, *२२ डिसेंबर २०२५ अखेर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.