Drought Satara : सातारा जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता वाढली, आणखी १२ मंडलात दुष्काळ जाहीर

Satara : सातारा जिल्ह्यात माण, खटावसह अनेक तालुक्यात दुष्काळाच्या झळा आतापासूनच असह्य होत आहेत.
Drought Satara
Drought Sataraagrowon

Maharashtra Satara Drought : महाराष्ट्रात मागच्या वर्षी कमी पावसामुळे अनेक जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यात माण, खटावसह अनेक तालुक्यात दुष्काळाच्या झळा आतापासूनच असह्य होत आहेत. मागच्या २ महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या दुष्काळात सातारा जिल्ह्यातील वाई आणि खंडाळा संपूर्ण तालुका आणि त्यानंतर इतर तालुक्यांतील ६५ मंडलात दुष्काळ जाहीर केला होता. यानंतर शासनाने आणखी १२ मंडलात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. दरम्यान याचा शेतकऱ्यांना अनेक सवलतीमध्ये फायदा होणार आहे.

सातारा जिल्ह्याला सह्याद्रीच्या पर्वत रांगांमुळे भरपूर पाऊस पडत असतो. यावर जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हंगामाच्या पिकांचे वाटचाल होत असते. परंतु मागच्या वर्षी मात्र, पर्जन्यमान कमी झाले होते. जून ते सप्टेंबर या चार पावसाळी महिन्यांचा विचार करता सरासरीच्या ७० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली.

याचबरोबर कोयनेसह अन्य मुख्य धरणांत कमी पाणीसाठा होता. दुष्काळी भागात चारा आणि पाणीटंचाईचेही संकट होते. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांसह राजकीय पक्षाकडूनही मागणी होत होती. त्यातच कमी पर्जन्यमानामुळे राज्य शासनाने ऑक्टोबर महिन्यातच राज्यातील ४० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले.

वाई आणि खंडाळ्यासह, माण, खटाव, फलटण, कोरेगाव हे तालुके पूर्वीपासून दुष्काळी आहेत. तालुक्यात पाण्यासाठी टँकर सुरू होते. चारा तसेच पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनीही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात शासनाने महसूल मंडलात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे.

Drought Satara
Strawberry Production Satara : स्ट्रॉबेरी शेतीसाठी सरकारकडून अनुदान देण्याची घोषणा, वाईन निर्मीतीलाही चालना

राज्य शासनाने आता १६ फेब्रुवारीला राज्यातील नवीन काही महसूल मंडलात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. ज्या महसूल मंडलाचे विभाजन झाले. तसेच नवीन महसूल मंडल निर्माण झाले अशा ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले नाही. त्याठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील १२ मंडलांचा समावेश झालेला आहे.

सातारा तालुक्यातील करंजे तर्फ सातारा, कोडोली मंडल अंतर्भूत झाले आहे. तर कऱ्हाड तालुक्यातील येळगाव, पाटणमधील येराड, आवर्डे, मारुल हवेली. फलटणमधील कोळकी, खटाव तालुक्यातील कलेढोण, भोसरे तर माणमधील वरकुटे मलवडी, आंधळी आणि काेरेगावमधील साप मंडलाचा समावेश आहे. या ठिकाणी आता दुष्काळी सवलती लागू झालेल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com