APMC Election Agrowon
ॲग्रो विशेष

Yavatmal Apmc Election : ग्रामपंचायत सदस्य बदलविणार बाजार समितीचे राजकारण

यवतमाळ जिल्ह्यातील १७ पैकी १५ बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

Team Agrowon

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील १७ पैकी १५ बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यंदा १५ ही बाजार समितीत २० हजार १७५ मतदारांची मतदार यादी निश्‍चित झाली आहे. यात साडेआठ हजार मतदार ग्रामपंचायत सदस्य आहेत.

त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सहकारी संस्था, व्यापारी-अडते, हमाल-मापारी यांच्यासोबतच ग्रामपंचायत सदस्यांची भूमिका बाजार समिती निवडणुकीत (Market Committee Election) निर्णायक असणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा (Agriculture Produce Market Committee) बिगूल वर्षभरानंतर वाजला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ३० एप्रिलपर्यंत निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बाजार समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

यंदा होणाऱ्या निवडणुकीत शेतकऱ्यांनाही उभे राहण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे उमेदवारांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत १५ बाजार समितीत ३०४ नामांकन दाखल झाले आहे.

सहकार विभागाने मतदारयादी निश्‍चित केली आहे. यात ५२५ सहकारी संस्थेतील सहा हजार ५८१, एक हजार २३ ग्रामपंचायतीमधील आठ हजार ४५५, एक हजार ४१० व्यापारी, दोन हजार १०१ हमाल मापारी मतदारांचा समावेश आहे.

नामांकनासोबत तहसीलदार किंवा तलाठी यांचा शेतकरी तसेच रहिवासी दाखल जोडणे बंधनकारक आहे.

नामांकन अर्जासोबत जात वैधता प्रमाणापत्र बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे राखीव प्रवर्गातील उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता होती.

यात शासनाने उमेदवारांना दिलासा दिला आहे. आता निवडून आल्यानंतर १२ महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करता येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT