Cotton Market : परभणीत कापूसदरात किंचित सुधारणा

Cotton Rate : परभणी जिल्ह्यातील मानवत, सेलू, परभणी या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कापूस खरेदीच्या दरात किंचित सुधारणा झाली असून अनेक दिवसांनंतर कापसाचे कमाल दर ८००० रुपयांवर गेले आहेत.
Cotton Market
Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

Cotton Market Update Parbhani : परभणी जिल्ह्यातील मानवत, सेलू, परभणी या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कापूस खरेदीच्या (Cotton Procurement Rate) दरात किंचित सुधारणा झाली असून अनेक दिवसांनंतर कापसाचे कमाल दर (Cotton Rate) ८००० रुपयांवर गेले आहेत. किमान दर मात्र ७००० रुपयांपेक्षा कमी आहेत.

सोमवारी (ता. ३) परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाची ३०० क्विंटल आवक होऊन किमान ६५०० ते कमाल ८१७० रुपये दर मिळाले. सेलू बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल किमान ६६३५ ते कमाल ८११५ रुपये तर सरासरी ८०५० रुपये दर मिळाले.

Cotton Market
BT Cotton Rate In India : केंद्र सरकार बीटी बियाण्याची दरवाढ रोखणार?

सेलू बाजार समितीत शनिवारी (ता. १) कापसाला प्रतिक्विंटल किमान ६४५० ते कमाल ८१२५ रुपये तर सरासरी ८०६० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. ३१) २१४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६३४५ ते कमाल ८१८० रुपये तर सरासरी ८११० रुपये दर मिळाले.

Cotton Market
Cotton, Soybean Rate Update : कापूस, सोयाबीन उभारी घेणार; तुरीतील तेजी कायम राहणार?

मानवत बाजार समितीत बुधवारपर्यंत (ता. २९) कापसाचे कमाल दर ८००० रुपयांपेक्षा कमी होते. परंतु गुरुवारपासून (ता. ३०) कमाल दर ८००० रुपयांवर पोहोचले आहेत.

गुरुवारी (ता. ३०) कापसाची २७५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ६६०० ते कमाल ८०७० रुपये तर सरासरी ७९५० रुपये दर मिळाले.

शुक्रवारी (ता. ३१) आणि शनिवारी (ता. १) कापसाला प्रतिक्विंटल किमान ६६०० ते कमाल ८२०० रुपये तर सरासरी ८१२५ रुपये दर मिळाले. दरात किंचित सुधारणा होत आहे.

परंतु ती फार काळ टिकून रहात नसल्याचे आजवरचे चित्र आहे. दहा हजार रुपये किंवा त्याहून अधिक दर मिळतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com