Rabbi season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : रब्बीमध्ये हरभऱ्याला सर्वाधिक पसंती शक्य

Team Agrowon

Parbhani News: परभणी व हिंगोली जिल्ह्यत यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. मोठे, मध्यम, लघू सिंचन प्रकल्पांसहविहिरी, बोअर आदी स्रोतांना पुरेसे पाणी आहे.

रब्बी पेरणीत क्त्षेरात वाढ अपेक्षित आहे. यंदाही हरभऱ्याला सर्धिवा क पसंती राहू शकते. त्यानंतर ज्वारी, गहू, करडई असा क्रम राहील. मूग, उडदाच्या जमिनी मोकळ्या झाल्या आहेत. सोयाबीन काढणी आटोपल्यानंतर मोठ्या क्त्षेरावर रब्बी पेरणी सुरू होईल. अतिवृष्टीमुळे सोयाबीनची उत्पादकता घटली आहे. बाजारभाव कमी आहे.

हाती पैसे नाहीत. रब्बी पेरणीसाठी बियाणे, खतांची तजवीज कशी करावी याची चिंता अनेक शेतकऱ्यांना लागली आहे. अद्याप अतिवृष्टीचे अनुदान तसेच पीकविमा मिळालेला नाही. बँका पीककर्जासाठी अडवणूक करत आहेत.

अतिवृष्टीबाधितांना अनुदान तसेच पीकविमा मिळाल्यास पेरणीसाठी थोडीबहुत पैशांची व्यवस्था होऊ शकते. अन्यथा उधारउसणवारी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते. कोरडवाहू बहुल क्षेत्र असलेल्या परभणी, हिंगोली जिल्ह्यात खरिपात सोयाबीननंतर रब्बीत हरभरा ही पीक पद्धती किफायतशीर ठरत आहे.

यंदाही रब्बीत हरभऱ्याला प्रथम पसंती राहू शकते. त्यानंतर ज्वारी, गहू, करडई या पिकांना शेतकऱ्यांचे प्राधान्य राहील. अनेकवेळा अतिवृष्टी झाली. पुरामुळे जमिनी खरडून गेल्या. सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांची नासाडी झाली. कीड, रोगांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट येत आहे.

काढणीसाठी मजुरीवरील खर्च वाढला. तणांची वाढ झाल्यामुळे मशागतीवर जास्त खर्चहोत आहे. हाती पैसे नसल्यामुळे रब्बी पेरणीच्या नियोजनात शेतकऱ्यांना अडचणी आहेत. पैशाची व्यवस्था न झाल्यास पेरणी लांबू शकते. वाफसा नसल्यामुळे पेरणी लांबली आहे. अतिवृष्टीमुळे कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित झालेला आहे. विहिरीत पाणी असूनही वीजपुरवठ्याअभावी पिकांना देता येणार नाही.

कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करावा लागेल. बेलुरा (ता. हिंगोली) येथील शेतकरी शंकर गु्ट् यटे ांनी २५ एकर सोयाबीन काढणीनंतर रब्बीत हरभरा १० एकर आणि गूह १५ एकरावर पेरणीचे नियोजन केले आहे. बियाणे, खते, मजुरीसाठी ८० ते ९० हजार रुपये खर्च लागण्याचा अंदाज आहे.

पिंपरी देशमुख (ता. परभणी) येथील सचिन देशमुख यांचे रब्बीत हरभरा १८ एकर, गहू २ एकर, ज्वारी १ एकर असे २१ एकर पैरणीचे नियोजन आहे. त्यांना खते, बीज प्रक्रिया घटक, या बरोबरच हरभरा बियाणे विकत घ्यायचे आहे. मजुरीसह अंदाजे ७० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

रब्बी पेरणी प्रस्तावित पेरणी क्षेत्र स्थिती (हेक्टरमध्ये) पीक परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा हरभरा १३९२०० १५६७५० ज्वारी ९६२०० १६९०० गहू ३०००० ३६०४० करडई २८५० २२३० सोयाबीन काढणीस आले आहे. पाऊस नाही आला तर दहा दिवसांत काढणी होईल. त्यापुढील आठवड्यात आधी हरभरा व नंतर गव्हाची पेरणी करणार आहोत.

यंदा सोयाबीन काढणीचा खर्च वाढला आहे. उताऱ्यात ५० टक्क्यांहून अधिक घट येत आहे. भाव कमी आहेत. अतिवृष्टी अनुदान, पीकविमा मिळाला तर पेरणीसाठी आधार होईल. - शंकर गुट्टे, बेलुरा, ता. जि. हिंगोली ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीन काढणीस येईल. सोयाबीन विक्रीतून रब्बी पेरणीसाठी आवश्यक रकमेची जुळवाजुळव झाली नाही तर पदरमोड करून रब्बीची पेरणी करावी लागेल.
सचिन देशमुख, पिंपरी देशमुख, ता. जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Birsa Munda anudan Scheme : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून मिळणार बैलगाडी, ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी अनुदान; जुन्या निकषांतही बदल

Soybean Procurement : ई-समृद्धी पोर्टलवर सोयाबीन खरेदीची नोंदणी शेतकऱ्यांनी की खरेदी केंद्रांनी करायची?

Tur Stock Limit : तूर, हरभऱ्यावरचे स्टाॅक लिमिट काढले; नवी तूर बाजारात येण्याच्या आधी स्टाॅक लिमिट काढल्याने दिलासा

Amravati Zila Parishad : अमरावती जिल्हा परिषदेत विधानसभा च्या तोंडावर, अधिकाऱ्यांची कमतरता

Crop Insurance Compensation : विमा कंपनीच्या पोर्टल बंदमुळे पूर्वसूचना थांबल्या

SCROLL FOR NEXT