Maize Chana : धानपट्ट्यात मका-हरभऱ्याला पसंती

Paddy Belt : धान शेतीत वाढते धोके, कमी दर या कारणांमुळे पर्यायी पिकांवर शेतकरी भर देत आहेत.
Maize
MaizeAgrowon
Published on
Updated on

Gondia News : धान शेतीत वाढते धोके, कमी दर या कारणांमुळे पर्यायी पिकांवर शेतकरी भर देत आहेत. त्यातूनच यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात हरभरा तसेच मक्‍याला शेतकऱ्यांची पसंती मिळाली असून या दोन्ही पिकाखालील क्षेत्र ८१०१.८ हेक्‍टरवर पोहोचले आहे.

राइस सिटी अशी जिल्ह्याची ख्याती आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदलामुळे कमी झालेली उत्पादकता त्यातच कमी मिळणारा दर यामुळे धान पीक जोखमीचे ठरत आहे.

Maize
Maize Market : खानदेशात मका आवक रखडत

यातूनच पीक फेरपालटाची मानसिकता असलेले शेतकरी पर्यायी पिकाच्या शोधात आहे. याच गरजेतून यंदा रबी हंगामात शेतकऱ्यांची मका आणि हरभऱ्याला पसंती मिळाली आहे.

मका, हरभरा लागवडकर्त्या शेतकऱ्यांनी त्याचवेळी गव्हाला बगल दिल्याचेही चित्र जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचे सरासरी रब्बी क्षेत्र २४,९४० असून त्यातील १,६६० हेक्‍टरवर मका लागवड करण्यात आली आहे. त्यासोबतच ६४४१ हेक्‍टरवर हरभरा लागवड आहे.

Maize
Chana Market : मोठ्या काबुली हरभऱ्याची खानदेशात आवक सुरू

मका-हरभऱ्याचे तालुकानिहाय क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

गोंदिया ०० १००५

गोरेगाव ४.८० ५६३.५०

तिरोडा ७.५० ७८९.७०

अर्जुनी मोरगाव १२०१ ६४७

देवरी १५४.४० १४१६

आमगाव ०० ६१०

सालेकसा ०० ५२०.३०

सडक अर्जुनी ०० ८९०

लाख-लाखोळी

तिसऱ्या क्रमांकावर

जिल्ह्यात रब्बी हंगामात लाख-लाखोळी या दाळवर्गीय पिकाच्या लागवडीवरही शेतकऱ्यांचा भर राहतो. यंदाच्या रब्बी हंगामात मात्र हे पीक तिसऱ्या क्रमांकावर गेले आहे. जिल्ह्यात यंदा ५,५३४ हेक्‍टर क्षेत्रात लाख-लाखोळीची लागवड आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com