Ai Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture AI Policy : कृषी ‘एआय’साठी धोरण तयार करण्याचा निर्णय

AI In Agriculture : राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत एआय तंत्र जावे; मात्र या प्रयत्नात सामान्य शेतकऱ्यासाठी तंत्र वापराचा खर्च कसा कमी करता येईल.

मनोज कापडे

Pune News : राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र नेण्यासाठी धोरण तयार केले जात असून काही अटीशर्तीदेखील निश्चित करण्याचा निर्णय कृषी खात्याने घेतला आहे. अटीशर्ती निश्चित करण्यासाठी कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, कृषी खात्याचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे व ‘पोकरा’चे प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी समन्वयातून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत एआय तंत्र जावे; मात्र या प्रयत्नात सामान्य शेतकऱ्यासाठी तंत्र वापराचा खर्च कसा कमी करता येईल. त्यामुळे एआय तंत्राचा प्रसार करणाऱ्या कंपन्यांसाठी सुटसुटीत नियमावली तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

एआय तंत्र प्रसारासाठी कृषी खाते नेमके काय पाऊल टाकते आहे, याचे सादरीकरणदेखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर कृषी खात्याने केले. या संदर्भात कृषिमंत्री अॅड. कोकाटे यांनी सांगितले, की कोणत्याही कंपन्या राज्यात कुठेही जातील आणि ‘एआय’च्या नावाखाली शेतकऱ्यांना लुबाडतील, असे होऊ नये, अशी आमची भूमिका आहे.

त्यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत कृषी सचिव, आयुक्त याबाबतचे धोरण तयार करतील. त्यानंतर लगेच एआय तंत्र घेऊ शेतकऱ्यांमध्ये जाण्याचे निश्चित केले गेले आहे. अर्थसंकल्पात केवळ ५०० कोटी रुपयांची तरतूद असली तरी ती वाढविण्याची तयारी सरकारची आहे. पहिल्या टप्प्यात पाच-सहा पिकांमध्ये हे तंत्र वापरले जातील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT