AI In Agriculture : ‘एआय’ तंत्रज्ञान शेतीच्या बांधापर्यंत पोहोचवावे

Nano Fertilizer : शेतकऱ्यांनी ‘इफ्को’च्या नॅनो खताबरोबरच ऊस पिकासाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करून उत्पादन वाढवावे.
Nano Fertilizer
Nano Fertilizer Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : शेतकऱ्यांनी ‘इफ्को’च्या नॅनो खताबरोबरच ऊस पिकासाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करून उत्पादन वाढवावे. हे नवे तंत्रज्ञान अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवावे, असे मत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी व्यक्त केले.

‘इफ्को’ आणि संजीवनी ग्रुपच्या सहकार्याने आयोजित परिसंवादात मार्गदर्शन करताना कोल्हे बोलत होते. ऊस पीक खत व्यवस्थापनात नॅनो खतांचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्तेचा ऊस उत्पादन व साखर उताऱ्यात प्रभावी वापर या विषयावर या परिसंवादात चर्चा करण्यात आली. राज्यभरातील विविध साखर कारखान्यांच्या दोनशे प्रतिनिधींनी त्यात सहभाग घेतला.

‘इफ्को’चे राज्य विपणन व्यवस्थापक श्री. यू. आर. तिजारे म्हणाले, की राज्यातील ३६ हजार सहकारी संस्थांच्या माध्यमातून ‘इफ्को’ आणि शेतकऱ्यांचे ५८ वर्षांचे नाते आहे. जगभर विविध खते व शेतीविषयक कीडनाशके यावर संशोधन सुरू आहे. पाणी आणि खतांच्या अधिक वापरामुळे जमिनीचा पोत दिवसेंदिवस कमी होत आहे.

Nano Fertilizer
AI in Agriculture: ‘एआय’साठी तरतूद वाढविणार

इफ्कोचे (पुणे) वरिष्ठ विपणन डॉ एम. एस. पोवार यांनी ऊस पीक खत व्यवस्थापनामध्ये ‘इफ्को’च्या नॅनो खतांचा वापर या विषयावर सखोल मार्गदर्शन केले, तर ऊस उत्पादन व साखर उताऱ्यात वाढ यासाठी एआय कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर याविषयी मृदा शास्त्र कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विशेषज्ञ डॉ. विवेक भोईटे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (पुणे) पीक उत्पादन व संरक्षणातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग यांनी मार्गदर्शन केले. ‘एआय’ तंत्रज्ञान वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात हमखास ३० टक्के वाढ होऊन खर्चात ४० टक्के बचत होते हे सिद्ध झाले आहे, असे विवेक भोईटे यांनी या वेळी सांगितले.

Nano Fertilizer
Ai Sugarcane Farming: ‘एआय’ ऊसशेतीचा प्रयोग देशभर

‘इफ्को’ एम. सी.चे (पुणे) विभागीय विपणन व्यवस्थापक दौलतराव बोरस्ते यांनी ऊस रोग व कीड व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन केले. ‘इफ्को’चे अधिकारी वैभव ढेपे, तुषार गोरडे यांनी सूत्रसंचालन केले.

संजीवनीचे केन मॅनेजर जी. बी. शिंदे, ऊस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, सी. एन. वल्टे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

‘एआय’ तंत्रज्ञानामुळे सर्व क्षेत्रांत मोठे फेरबदल होण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यावर जगभर मंथन सुरू आहे. मात्र एआय तंत्रज्ञान ऊस पिकाला वरदान ठरणार आहे. हे आता सिद्ध झाले आहे. उत्पादन खर्च आणि पाण्याचा वापर कमी आणि उत्पादनात भरीव वाढ अशी किमया या तंत्रज्ञानाने ऊसशेतीत करून दाखविली आहे.
- बिपिन कोल्हे, अध्यक्ष, संजीवनी ग्रुप, कोपरगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com