Abdul Sattar Agrowon
ॲग्रो विशेष

Abdul Sattar : सर्व घटकांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध

Agriculture News : समाजातील एकोपा व शांतता कायम ठेवून प्रगतीचा वेग कायम राखू, असे प्रतिपादन राज्याचे पणन, अल्पसंख्याक विकासमंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : विविध लोकोपयोगी योजनांच्या माध्यमातून शासन समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहे. समाजातील एकोपा व शांतता कायम ठेवून प्रगतीचा वेग कायम राखू, असे प्रतिपादन राज्याचे पणन, अल्पसंख्याक विकासमंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय सोहळा गुरुवारी (ता. १५) विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. त्या वेळी श्री. सत्तार बोलत होते.

या सोहळ्यास खासदार संदिपान भुमरे, विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी खासदार इम्तियाज जलील, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, म.न.पा. आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा, पोलीस आयुक्त प्रदीप पवार, उपायुक्त जगदीश मिनियार, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच प्रशासनातील सर्व अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, हुतात्मा जवानांचे कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सत्तार म्हणाले, बिडकीन येथे लुब्रिझोल या कंपनीचा १२० एकर जागेत प्रकल्प येतोय. या प्रकल्पामुळे ९०० जणांना थेट रोजगार व अन्य लहान उद्योगही कार्यान्वित होतील. टोयोटा-किर्लोस्कर प्रकल्पाची २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होते आहे. या प्रकल्पामुळेही ८ हजार जणांना प्रत्यक्ष व ८ हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल.

एथर एनर्जी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत जिल्ह्यात ५ लाख ३२ हजार ७६९ बहिणींचे अर्ज मंजूर झाले. अन्नपूर्णा या योजनेचा जिल्ह्यातील १ लाख ६८ हजार ८५८ महिलांना लाभ मिळणार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यात २३१८ रिक्तपदे विविध आस्थापनांनी नोंदविली. २२२७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यांना सहा महिने प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण व विद्यावेतनही मिळेल.

अल्पसंख्याक आयुक्तालय कार्यान्वित झाल्याने अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाला चालना मिळेल. मराठवाड्यात दुग्धविकासाला चालना देण्यासाठी ३२८ कोटी ४२ लाख रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार. तीन वर्षांच्या कालावधीत विदर्भ आणि मराठवाड्याच्या १९ जिल्ह्यात १३ हजार ४०० दुधाळ जनावरांचे वाटप होईल.

पंतप्रधान आवास योजना ग्रामीण, रमाई व शबरी या तिन्ही योजनेचे मिळून ७ हजार ७५८ घरकुले पूर्ण झाली. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत आर्थिक २५५.०८ टक्के साध्य करण्यात आले. जल जीवन मिशनअंतर्गत ११६१ योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध व्यक्तिंना सन्मानित करण्यात आले. प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचलन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

HTBT Cotton: ‘एचटीबीटी’ कापसावरील बंदी उठविली जाणार?

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेत बदल अशक्य : कोकाटे

Nagpur Market Scam: नागपूर बाजार समितीतील घोटाळ्याची ‘लाचलुचपत’मार्फत चौकशी

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेला राज्यात थंडा प्रतिसाद

Vidarbha Rain Forecast: विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT