Nagpur News: माहिती अधिकार कायदा सर्वसामान्य माणसाच्या हातात असलेले अत्यंत प्रभावी शस्त्र आहे. परंतु, माहिती अधिकाराचे ज्ञान अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील नाही, अशी खंत माजी सनदी अधिकारी, अमरावतीचे विभागीय माहिती आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी व्यक्त केली..जनमंचतर्फे ‘जनसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. ‘माहिती अधिकार कायदा निष्प्रभ झाला आहे का0’ असा संवादाचा विषय होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी लाभले होते. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर, साहित्य प्रसार केंद्राचे मकरंद कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात अभय कोलारकर लिखित ‘माहिती अधिकार कायदा कितपत प्रभावी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. र.Ravindra Chavan: 'महायुती'त धुसफूस! २ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची, नंतर...; रवींद्र चव्हाणांच्या विधानानं खळबळ.वींद्र ठाकरे म्हणाले, अधिकाऱ्यांना वारंवार प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. परंतु, जोवर अधिकाऱ्यांना दंड होत नाही तोवर यामध्ये सुधारणा होणे शक्य नाही. कायद्याला निष्प्रभ करायचे की सक्षम ठेवायचे, हे काम आमच्या अधिकाऱ्यांचे आहे. परंतु, अधिकाऱ्यांना कामी लावण्यासाठी सुजाण, सुज्ञ माहिती अधिकार कार्यकर्ते निर्माण होणे गरजेचे आहे. प्रथम अपील आपल्याशिवाय माहितीच दिली जात नाही, हे वास्तव आहे..Interview with IAS Varsha Ladda Untwal: मनुष्यबळाचा प्रश्न सोडविण्याला पहिले प्राधान्य.भ्रष्ट व्यवस्थेला नागरिक जबाबदार : डॉ. जोशीडॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यवस्थेला जबाबदार सामान्य नागरिकांवर निशाणा साधला. कायदे तयार करण्यात व्यवस्था प्रचंड तज्ज्ञ आहे..मात्र, त्याची अंमलबजावणीच होत नाही. माहिती अधिकारात द्वितीय अपील होत आहेत, याचा अर्थ पहिले दोन टप्पे अपयशी ठरत आहे. याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. ही व्यवस्था भ्रष्ट करण्यात नागरिकच जबाबदारी आहे, असेही डॉ. जोशी म्हणाले.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.