Eco Friendly Farming: रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीची सुपीकता घटत असताना, पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीकडे वळणे ही काळाची गरज बनली आहे. याच गरजेचे भान ठेवत महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत पुणे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी जिवाणू खतांच्या प्रशिक्षणातून केवळ कुशल होत नाहीत, तर थेट उद्योजकतेकडे वाटचाल करत आहेत. ही केवळ प्रशिक्षण योजना नाही, तर माती, शेती आणि भविष्य यांना जोडणारी एक सकारात्मक चळवळ ठरत आहे..पुणे कृषी महाविद्यालयातील बी.एस्सी. कृषी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देण्यावर विशेष भर दिला जात आहे. महाविद्यालयातील ‘जैविक नत्र स्थिरीकरण योजना’ अंतर्गत विद्यार्थी जीवाणू खतांचे उत्पादन, वापर, प्रशिक्षण व जनजागृती यामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. हे विद्यार्थी थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून जिवाणू खतांचे महत्त्व, योग्य वापर व फायदे समजावून सांगत आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण होत आहे..Rural Innovation: माती, बियाणे आणि माणूस .१९६० पासून चाललेली योजनामहात्मा फुले कृषी विद्यापीठाने सन १९६० पासून ‘जैविक नत्र स्थिरीकरण योजना’ सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे रायझोस्फीयर मातीमधून उपयुक्त सूक्ष्मजीव वेगळे करणे, त्यांचे संवर्धन करणे व जमिनीची सुपीकता वाढवून उत्पादनात सुधारणा घडवणे..ही योजना कृषी अनुजीवशास्त्र विभागांतर्गत राबवली जाते. योग्य तंत्रज्ञानाच्या साह्याने नत्र स्थिरीकरण करणारे, स्फुरद विद्रावक, पालाश वाहन करणारे कार्यक्षम जिवाणू विकसित करून त्यांची चाचणी व व्यावसायिक वापर केला जातो. सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुभाष भालेकर आणि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली ती राबवली जात असून, प्रत्यक्ष अनुजीवशास्त्रज्ञ म्हणून डॉ. राजेंद्र खडतरे कार्यरत आहेत..Sustainable Agriculture Future: ‘रेसिड्यू फ्री’ उत्पादनात शाश्वत शेतीचे भवितव्य.प्रशिक्षणातून उद्योजकतेकडेमागील पाच वर्षांपासून या योजनेअंतर्गत जिवाणू खतांचा प्रसार व प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात येत आहे. आतापर्यंत ८० लाभार्थ्यांना जिवाणू खतांचे उत्पादन, प्रक्रिया, पॅकिंग ते विक्रीपर्यंतचे संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पाच दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाच हजार रुपये शुल्क आकारले जाते. विशेष म्हणजे, या प्रशिक्षणातून १० नवीन उद्योजक यशस्वीपणे तयार झाले असून ते सध्या स्वतःचा व्यवसाय करत आहेत..उत्पादन, विक्री आणि उत्पन्नया योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी घन व द्रव स्वरूपातील जिवाणू खते उपलब्ध करून दिली जातात. घन स्वरूपातील खते ही २५० ग्रॅम (रु. ३५), ५०० ग्रॅम (रु. ६०), १ किलो (रु. १००), तर द्रव स्वरूपातील खते २५० मिलि (रु.७०), ५०० मिलि (रु. १३५), १ लिटर (रु.२५०) दराने उपलब्ध करून दिली आहेत. या विक्रीतून दरवर्षी सरासरी १२ ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. दर्जेदार आणि विश्वासार्ह जिवाणू खतांमुळे ही योजना शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली आहे..“जिवाणू खतांचे प्रशिक्षण घेतल्यामुळे मला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची दिशा मिळाली. आज मी शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक शेतीकडे वळण्यासाठी मार्गदर्शन करतोय, याचा अभिमान वाटतो.” डॉ. राजेंद्र खडतरे ९०२२०५२८५९.महेश भुते, प्रशिक्षणार्थी युवा उद्योजक, निफाड, नाशिक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.