Parbhani News : आगामी आर्थिक वर्षे (२०२५-२६) करिता राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (नाबार्ड) परभणी जिल्ह्यासाठी ५ हजार ३०५ कोटी ६७ लाख ५३ हजार रुपयांचा संभाव्य पतपुरवठा योजना (पीएलसीपी) जाहीर केली आहे.
त्यात एकूण कृषी कर्जासाठी ३ हजार २०९ कोटी ९२ लाख ७३ हजार रुपये तर त्याअंतर्गंत पीककर्जासाठी २ हजार ६५० कोटी ५ लाख ११ हजार रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे अशी माहिती नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक एस. के. नवसारे यांनी दिली.
२०२५-२६ आर्थिक वर्षामध्ये परभणी जिल्ह्यात कृषीकर्ज घटकाअंतर्गंत पीककर्ज २ हजार ६५० कोटी ५ लाख ११ हजार रुपये, जल संसाधन उपाययोजना कर्ज १०६ कोटी ४ लाख १० हजार रुपये,कृषी यांत्रिकीकरण कर्ज १४१ कोटी ६२ लाख ३० हजार रुपये, वृक्षलागवड व रेशीम शेतीसह फलोत्पादन कर्ज ९४ कोटी ८६ हजार रुपये,वनीकरण व पडिक जमिन विकास कर्ज १ कोटी ३२ लाख ८४ हजार रुपये,
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कर्ज ९० कोटी १४ लाख ८२ हजार रुपये, कुक्कुटपालन व्यवसाय कर्ज ७२ कोटी ९२ लाख ८५ हजार रुपये, शेळीपालन, मेंढीपालन, वराहपालन व्यवसाय कर्ज २३ कोटी ९९ लाख ६ हजार रुपये, मत्स्यपालन व्यसायासाठी ८ कोटी ७४ लाख ३६ हजार रुपये, इतर कृषी कर्जासाठी २१ कोटी ६ लाख ४३ हजार रुपये उद्दिष्टांची तरतूद आहे.
कृषी पायाभूत सुविधा अंतर्गंत शेतीमाल साठवणुकीसाठी वखार गोदाम सुविधांच्या उभारणीसाठी ६९कोटी ८३ लाख ६० हजार रुपये, जमिन सुधारणा, मृदा संधारण, पाणलोट क्षेत्र विकास घटकांसाठी १२ कोटी ९९ लाख ११ हजार रुपये, इतर कृषी पायाभूत सुविधांसाठी ३३ कोटी ३९ लाख रुपये असे मिळून एकूण ११६ कोटी २१ लाख ७१ हजार रुपये कर्जाचे उद्दिष्ट आहे.
कृषी संलग्न अंतर्गंत अन्न व कृषी प्रक्रियासाठी २०१ कोटी २० लाख २ हजार रुपये व इतर १४९ कोटी ९६ मिळून एकूण ३५० कोटी ९६ लाख २ हजार रुपये कर्जाचे उद्दिष्ट आहे. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगासाठी १ हजार २५९ कोटी २९ लाख ८० हजार रुपये तर गृह, शैक्षणिक कर्ज आदीसाठी ३६९ कोटी २७ लाख २७ हजार रुपये उद्दिष्ट आहे.
परभणी जिल्हा संभाव्य वार्षिक पतपुरवठा योजना २०२५-२६ दृष्टीक्षेपात (उद्दिष्ट कोटी रुपये)
क्षेत्र उद्दिष्ट
कृषी कर्ज ३२०९.९२
पीककर्ज २६५०.०५
कृषी मुदत कर्ज ५५९.८७
कृषी पायाभूत सुविधा ११६.२१
अन्न व कृषी प्रक्रिया २०१.२०
सूक्ष्म,लघु,मध्यम उद्योग १२५९.२९
निर्यात पतपुरवठा २४.१२
शैक्षणिक कर्ज ५८.९०
गृह कर्ज १३२.७५
नवीकरणीय ऊर्जा १२.२२
सामाजिक पायाभूत सुविधा ४०.९५
इतर कर्ज १००.३२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.