Crop Loan : साताऱ्यात कर्जमाफीच्या आशेने थकले पीककर्ज

Farmer Loan Waive : विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी निवडणूक जाहीरनाम्यात कर्जमाफीची घोषणा केल्याने शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लक्ष लागले आहे.
Farmer Loan Waive
Farmer Loan WaiveAgrowon
Published on
Updated on

Satara News : विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी निवडणूक जाहीरनाम्यात कर्जमाफीची घोषणा केल्याने शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लक्ष लागले आहे. या घोषणेचा परिणाम कर्ज न भरण्यावर झाल्याचा दिसून येत असून सध्या पीककर्ज घेणाऱ्या एक लाख ५७ हजार शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाचे नूतनीकरण केलेले नाही.

नियमित कर्जफेड करणाऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना झाल्याने पीककर्ज नवे-जुने करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मार्च महिन्याअखेर किती कर्ज भरले जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अलीकडच्या काळात सर्वच बॅंकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्जासह शेतीपूरक व्यवसायालाही कर्ज वितरण होत आहे; पण सर्वाधिक पीक कर्ज हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून होते.

पीक कर्जाला केंद्र व राज्य सरकारच्या व्याज सवलत योजनेचा लाभ मिळत असल्याने जिल्हा बॅंकेचे कर्ज हे बिनव्याजीच पडते. या दोन योजनांतून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही व्याज परतावा दिला जातो, तसेच मध्यम व दीर्घ मुदत कर्जही शेतकऱ्यांकडून घेतले जाते. त्यातून शेतीपूरक व्यवसाय व आधुनिक शेतीसाठी उपयोग केला जातो.

Farmer Loan Waive
Farmer Loan Waiver : सरकारला शेतकरी कर्जमाफीचा विसर

शेतकऱ्यांच्या डोक्यावरील पीक कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी महाविकास आघाडी व नंतर महायुतीच्या काळात कर्जमाफी झाली, तसेच कर्जमाफीत न बसलेले; पण वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान योजना देऊन त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात आले. यातील अनेक शेतकरी अजूनही प्रलंबित आहेत.

Farmer Loan Waive
Rabbi Crop Loan : सांगली जिल्ह्यात रब्बी पीककर्ज वितरण संथगतीनेच ; डिसेंबरअखेर ११ टक्के वाटप

डिसेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील एक लाख ५७ हजार ०८१ शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे नूतनीकरण केलेले नाही. ते कर्जमाफीच्या आशेवरच आहेत. परिणामी, मार्चअखेर जवळ आल्याने बॅंकांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावण्यास सुरुवात केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुतीकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबतचे आश्वासन देण्यात आले होते. निकालानंतर पुन्हा महायुतीचेच सरकार सत्तेत आल्याने कर्जमाफीबाबत आशा आहेत. मात्र सरकारकडून कर्जमाफीबाबत घोषणा होण्याचे संकेत नाहीत.

जिल्ह्यातील कर्जवाटप स्थिती

एकूण पीक कर्जवाटप चार लाख २५ हजार २८७ शेतकरी

डिसेंबर २०२४ पर्यंत कर्ज परतफेड केलेले शेतकरी दोन लाख ६८ हजार २०६

कर्ज नूतनीकरण न केलेले शेतकरी एक लाख ५७ हजार ८१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com