Moong Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Moong Crop : जळकोटमध्ये मूग पिकाला लगडल्या शेंगा

Moong Farming : शेतशिवारात यंदा मुगाला मोठ्या प्रमाणावर शेंगा लगडल्या आहेत. त्यामुळे यंदा चांगले उत्पादन होईल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.

Team Agrowon

Latur News : सततच्या पावसाने तालुक्यात यंदा खरिपातील पिके डोलत आहेत. या हंगामातील पहिल्या टप्प्यात मुगाचे पीक आता हाती येणार आहे. शेतशिवारात यंदा मुगाला मोठ्या प्रमाणावर शेंगा लगडल्या आहेत. त्यामुळे यंदा चांगले उत्पादन होईल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. मात्र, काही भागात पिकावर अळी व रोगाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. त्यामुळे शेतकरी कीटकनाशक फवारणी करून पिकाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.

जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांनी मुगाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. सुरवातीला पावसाने उघडीप दिल्यामुळे मुगाची वाढ योग्य प्रकारे झाली नव्हती. मात्र, यानंतर सततच्या रिमझिम पावसामुळे मुगाच्या पिकाला दिलासा मिळाला. अनेक भागात मुगाची वाढ चांगल्या प्रकारे झाली आहे.

सध्या श्रावण महिन्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये मुगाला शेंगा मोठ्या प्रमाणात लगडल्या असल्याचे दिसून येत आहे. या शेंगा व चट्टे पाहून मुगाची डाळ यंदा शेतकऱ्यांना विकत घ्यावी लागणार नाही, अशी स्थिती आहे. सर्वांत लवकर येणारे खरिपातील पीक म्हणून याकडे पाहिले जाते. विशेषतः पोळ्याच्या सणाला आर्थिक तजवीज करण्यासाठी मुगाचे पीक मोठा आधार ठरत असते.

कीड रोगाचा प्रादुर्भाव

यावर्षी निसर्गाने साथ दिल्यामुळे मुगाची वाढ चांगली झाली आहे. शेंगाही चांगल्या लागल्या आहेत. यावर्षी कीड रोगाचा प्रादुर्भाव अधिक आहे. यामुळे याचा फटका मुगाला बसत असल्याने अनेक शेतकरी औषधी फवारणीसह उपाययोजना करत आहेत. अर्थात मुगाच्या शेंगा वळतात. त्यावेळी पाऊस पडला तर अधिक नुकसान होते. पुढील उत्पादने पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे.

गतवर्षी पिकाला बसला होता फटका

गतवर्षी मूग ऐन फुलोऱ्यात असताना पावसाने मोठ्या प्रमाणात उघडीप दिली होती. त्यामुळे मुगाचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना घरी खायलाही मूग झाले नव्हते. यामुळे शेतकऱ्यांना विकत मूग घेऊन वर्ष काढावे लागले होते. मात्र, यंदा मुगाचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता दिसत आहे. मुगाच्या झाडाला शेंगा व चट्टे चांगली लागली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT