Agriculture Electricity
Agriculture Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : शेतीला दिवसा वीज द्या

Team Agrowon

Kolhapur News : माजगावमध्ये महावितरणने कृषिपंपासाठी (Agriculture Pump) एप्रिल महिन्याचे वीजपुरवठा (Electricity Supply) वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र हे गैरसोयीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे वीजपुरवठा वेळापत्रक बदलण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

महावितरणकडून शेतीसाठी दिवसा तीन दिवस, तर रात्री चार दिवस आठ तास वीजपुरवठा केला जातो. दर महिन्याच्या १ तारखेला महावितरणकडून कृषिपंपांच्या वीजपुरवठा वेळापत्रकात बदल केला जातो.

नुकतेच महावितरणने एप्रिल महिन्याचे कृषिपंपासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये रात्री १०.३० ते सकाळी ६.३० पर्यंत व दिवसा सकाळी ६.३० ते दुपारी २.३० पर्यंत असा वीजपुरवठा केला जात आहे. ही वेळ शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत चुकीची ठरत आहे.

रात्रीच्या वेळी शेतकरी काटेकुटे, साप, विंचू तुडवत शेतात पाणी पाजायला जात असतो. रात्री गवे, बिबट्या, डुक्कर, कोल्हा, साप, विंचू यांसारखे वन्यप्राणी शेतकऱ्यांवर हल्ला करू शकतात.

रात्रीच्या वेळी पिकांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या अनेक शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे.

डोंगरातील वणवा व ओल्या चाऱ्याच्या कमतरतेमुळे गवे शिवारात येऊन पीक फस्त करून नासधूस करत आहेत.तसेच शिवाय रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देताना पाण्याचा अपव्यय होतो. शिवाय अंधारात तुटलेल्या वीज तारा धोकादायक फ्यूजपेट्याचा शेतकऱ्यांना अंदाज येत नाही.

ज्या-त्या महिन्यातील विजेची उपलब्धता आणि मागणी याचा समतोल साधून जिल्हा हेड ऑफिस कृषिपंपाचे वीजपुरवठा वेळापत्रक ठरवत असते. सध्याच्या वेळापत्रकाबद्दल काही तक्रार असेल तर शेतकरी लेखी तक्रार हेड ऑफिसकडे करू शकतात.
सचिन पाटणकर, अभियंता, कळे वीज केंद्र
सध्याचे कृषिपंपाचे वीजपुरवठा वेळापत्रक शेतकऱ्यांसाठी त्रासदायक व गैरसोयीचे ठरत आहे. शिवारात गव्यांचा वावर वाढला आहे. महावितरणने शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करावा.
राजाराम शिंदे, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Food Distribution System : अन्नधान्य वितरणासाठी राज्य, केंद्र शासनाच्या योजना

Aquatic Ecosystem : कांदळवने : एक महत्त्वाची जलीय परिसंस्था

Healthy Ambadi : आरोग्यदायी पौष्टिक अंबाडी

Market Price Kolhapur : कोथिंबिरीची पेंढी ४० रुपयांना, लोणच्याच्या आंब्यांना मागणी

Rural Development : पंचायत राज रचनेतून ग्राम विकासाला चालना

SCROLL FOR NEXT