Turmeric Market Agrowon
ॲग्रो विशेष

Wasmat Turmeric : ‘वसमत हळद’ नावाने मिळाले ‘जीआय’ मानांकन

Turmeric GI Rating : हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हळद पारंपरिक पीक आहे. गुणवत्तेच्या बाबतीत या जिल्ह्यातील विशेषतः वसमत तालुक्यातील हळद वैशिष्ट्यपूर्ण आहे.

माणिक रासवे

Hingoli News : जिल्ह्यातील हळदीला ‘वसमत हळद’ या नावाने भौगोलिक मानांकन (जिओग्राफिकल इंडिकेशन ः जी.आय.) प्राप्त झाले आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अंतर्गत भौगोलिक संकेत (जी.आय.) विभागाने शनिवारी (ता. ३०) अधिसूचना प्रसिद्ध केली असून, त्यानुसार क्लास ३१ मध्ये ‘वसमत हळद’ची (टर्मरिक) नोंद करण्यात आलेली आहे.

जी.आय. मानांकनामुळे हिंगोली जिल्ह्यातील हळदीची जगभरात स्वतंत्र ओळख निर्माण होईल, अशी माहिती वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या सूत्रांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हळद पारंपरिक पीक आहे. गुणवत्तेच्या बाबतीत या जिल्ह्यातील विशेषतः वसमत तालुक्यातील हळद वैशिष्ट्यपूर्ण आहे. अलीकडील काही वर्षांत हळद हे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक झाले.

हळदीच्या क्षेत्राचा जिल्हाभरात विस्तार झाला. त्यामुळे देशभरात हळदीचा जिल्हा अशी हिंगोलीची ओळख निर्माण झाली. जिल्ह्यातील हळदीला भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न केले जात होते.

वसमत तालुक्यातील हळदीला जी.आय. मानांकन मिळावे यासाठी२० ऑक्टोबर २०२१ रोजी वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील कुरुंदकर फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनी व सातेफळ येथील सूर्या फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनी या शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत अर्ज करण्यात आला होता.

त्यानंतर वसमत येथे स्थापन झालेल्या बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून तज्ज्ञांनी जिल्ह्यातील हळदीला ‘वसमत हळद’ या नावाने जीआय मानांकन प्राप्त व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले. निकष पूर्ण केल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील हळदीला आता ‘वसमत हळद’ या नावाने जी.आय. (भौगोलिक मानांकन) प्राप्त झाले आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अंतर्गत भौगोलिक संकेत (जी.आय.) विभागाने शनिवारी (ता. ३०) प्रसिद्ध केलेल्या यादीत हिंगोली जिल्ह्यातील वसमत हळदीचा समावेश आहे. या कामासाठी पद्मश्री डॉ. रजनीकांत यांनी सहकार्य लाभले, असे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Economy: आली लहर, केला कहर

Maharashtra Farming: शेतकरी : वर्णव्यवस्थेतला तळाचा घटक

Tomato Disease Management: टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण

Wine Industry: ‘वाइन’ भूमी: कॅलिफोर्नियातील नापा व्हॅली

Weekly Weather: राज्यात ईशान्य मॉन्सूनचे आगमन

SCROLL FOR NEXT