Turmeric and Jaggery Hamal Rate : हळद, गूळ खरेदीवरील हमाली दरवाढीवर शिक्कामोर्तब

Price Hike Update : सांगली बाजार समिती प्रशासन आणि हळद, गूळ खरेदी विभागातील हमाली व महिला कामगार मजुरी दरवाढीबाबत व्यापारी प्रतिनिधी, हमाल प्रतिनिधी यांची बैठक झाली. या बैठकीत दर वाढीचा निर्णय घेण्यात आला.
Turmeric and Jaggery
Turmeric and JaggeryAgrowon

Sangli News : सांगली बाजार समिती प्रशासन आणि हळद, गूळ खरेदी विभागातील हमाली व महिला कामगार मजुरी दरवाढीबाबत व्यापारी प्रतिनिधी, हमाल प्रतिनिधी यांची बैठक झाली. या बैठकीत दर वाढीचा निर्णय घेण्यात आला.

हळद, गूळ खरेदी विभागातील हमाली मजुरी कराराची मुदत ३१ डिसेंबर २०२५ अखेर व महिला कामगार मजुरी कराराची मुदत ही २८ फेब्रुवारी २०२६ अखेर राहील असे सर्वानुमते ठरविले. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल व महिला कामगार यांच्या मजुरी दरवाढीबाबत चर्चा झाली. सभापती सुजय शिंदे यांनी यांनी सर्वच शेतीमालाच्या आवकेचे प्रमाण कसे वाढेल यावर प्रयत्न करण्याचे ठरविले.

Turmeric and Jaggery
Turmeric Production : हळदीच्या उत्पादकतेत घट, शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले

शेतीमालाची आवक वाढल्याने हमाल बांधवांनाही त्याचा फायदा होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असे ते म्हणाले. गेली २ वर्षे बाजार समिती आवारात खरेदी विभागाकडील हमाली दरवाढ केली नसल्यामुळे याबाबत चर्चा करण्यात आली. यानुसार महिला मजुरीमध्ये वाढ करून त्यांना हळद निवडणे, साफ करणे, वेचणे दर प्रति दिवसास ३०५ रुपये रुपये व हळद पावडर चाळण मशिनवर काम करण्यास महिला मंजुरी ३२५ रुपये अशी वाढ करण्यात आली.

Turmeric and Jaggery
Jaggery Rate : गूळ दरात वाढ नाहीच

हळद खरेदी विभागाकडील हमाली मजुरीमध्ये ७.५१ टक्के वाढ करण्यात आली. गूळ खरेदी विभागाकडील हमाली मजुरीमध्ये ७.५० टक्के वाढ करण्यात आली. गूळ मोठे रवे माप टाकणे, अगर काढणे १ एक रुपया व मोटार भरणे १.२५ रुपया अशी वाढ झाली. गूळ बॉक्सच्या हमाली मजुरीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मजुरीचे दर हे माथाडी मंडळाच्या लेव्हीचे दर सोडून आहेत.

या वेळी बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण, संचालक संग्राम शिंदे, प्रशांत पाटील-मजलेकर, सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई, हळद व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत मर्दा, गूळ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शरद शहा आणि हळद व गूळ खरेदीदार व्यापारी कौशल शहा, धनाजी जाधव, हार्दिक सारडा, संचालक व हमाल प्रतिनिधी मारुती बंडगर, हमाल पंचायतीचे सरचिटणीस विकास मगदूम, बाळासो बंडगर, खरेदी विभागामध्ये काम करणारे हमाल कामगार प्रल्हाद व्हनमाने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com