Turmeric Production : हळदीच्या उत्पादकतेत घट, शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले

Turmeric Farming : यंदा हिंगोली जिल्ह्यातील हळदीच्या उत्पादकतेत मोठी घट येत आहे. कीड, रोगाच्या व्यवस्थापनावर जास्त खर्च करावा लागला.
Turmeric Farming
Turmeric FarmingAgrowon
Published on
Updated on

Hingoli News : २०२३ च्या हंगामात हळद लागवडीस उशिरा झाला. त्यात पिकांच्या संवेदनशील अवस्थेत पावसाचा खंड पडला. कंदमाशी ही कीड तसेच करपा व कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव यासह पोषक वातावरण नसल्यामुळे यंदा हिंगोली जिल्ह्यातील हळदीच्या उत्पादकतेत मोठी घट येत आहे. कीड, रोगाच्या व्यवस्थापनावर जास्त खर्च करावा लागला. उत्पादकता घटल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.

हिंगोली जिल्ह्यात २०२३ मध्ये २४ हजार १७१ हेक्टरवर हळद लागवड झालेली आहे. जिल्ह्यातील विविध हळद काढणीचा हंगाम सुरू आहे. शेत शिवारात हळद काढणी, शिजविणे, वाळवणे आदी कामे सुरू आहेत. सततच्या दुष्काळी स्थितीमुळे ऊस, केळी या पिकांच्या तुलनेत किफायतशीर ठरत असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक हळद पिकांकडे वळले.

Turmeric Farming
Turmeric Harvesting : देशात हळद काढणी ७० टक्के आटोपली

गादी वाफा (बेड) लागवड, ठिबक सिंचन पद्धती, विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरामुळे उत्पादकतेत वाढ झाली. गेल्या काही वर्षांत हळद लागवड ते काढणी, काढणीपश्‍चात कामांचे यांत्रिकीकरण झाले. त्यामुळे मजुरीवरील खर्च कमी झाला. परंतु गेल्या काही वर्षांपासून कीड, रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

त्यात मागील दोन, तीन वर्षांत सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे पाणी साचून राहिल्याने कंदकुज, कंदसडीचे प्रमाण वाढले. त्यामुळे उत्पादकता कमी झाली आहे. कमी बाजारभाव वाढलेली मजुरी, यामुळे निव्वळ नफा कमी उरत असल्यामुळे गेल्यात तीन वर्षांपासून जिल्ह्यातील हळदीचे क्षेत्र कमी होत आहे. २०२२ तुलनेत हळदीच्या क्षेत्रात १० हजार ९१० हेक्टरने घट झाली आहे. २०२३ च्या जून अखेरपासून हळदीचे दरात सुधारणा झालेली आहे.

Turmeric Farming
Turmeric Farming : युवकाने विकसित केले हळदीचे दर्जेदार वाण
यंदा पावसास उशीर झाल्यामुळे जुलैपर्यंत लागवड लांबली. वाढीच्या काळात पोषक वातावरण नव्हती. यंदा अनेक भागांत पाने अकाली वाळली. फेरपालट नसलेल्या भागात तसेच बेणे बदल न केलेल्या भागात कंदमाशी ही कीड व करपा व कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव पडला या कारणांमुळे यंदा हळदीच्या उत्पादकतेत सरासरी २० ते २५ टक्के घट येत असल्याचे आढळून येत आहे.
अनिल ओळंबे, उद्यानविद्या विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर, जि. हिंगोली
यंदा हळदीचे क्षेत्र कमी करून ३ एकर लागवड केली. मागील वर्षी एकरी ३५ क्विंटल उत्पादन मिळाले होते. यंदा एकरी १६ क्विंटल उत्पादन मिळाले. यंदा करप्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. कंद भरले नाहीत. त्यामुळे उत्पादकता घटली. रोगाच्या प्रादुर्भावामुळे व्यवस्थापनाचा खर्च वाढला.आमच्या भागात सरासरी ४० टक्के घट आहे.
पंकज अडकिणे, डोंगरकडा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली
करप्याचा प्रादुर्भाव तसेच पावसाच्या खंडामुळे यंदा हळदीच्या उत्पादकतेत दरवर्षीच्या तुलनेत एकरी ४ ते ५ क्विंटल घट झाली आहे. मजुरीच्या दरात फारशी वाढ नाही. एप्रिल अखेरपर्यंत काढणी होईल. यंदा उत्पादन घटल्यामुळे हळदीच्या दरात तेजी राहू शकते.
प्रल्हाद बोरगड, सातेफळ, ता. वसमत, जि. हिंगोली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com