Sangli News : देशातील हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात हळदीची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या ७० टक्के हळद काढणी आटोपली असून ३० टक्के हळद येत्या पंधरा ते वीस दिवसांत पूर्ण होईल.
परंतु पावसाच्या खंडामुळे हळद उत्पादनात ३० टक्के घट होईल. तसेच देशातील हळदीच्या उत्पादनाचे चित्र एप्रिलमध्ये स्पष्ट होईल, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकार आणि हळद संशोधन केद्रांने व्यक्त केला आहे.
देशातील महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू यासह अन्य राज्यांत हळदीची लागवड केली जाते. यंदाच्या हंगामात पाण्याअभावी हळद लागवड उशिरा सुरू झाली. त्यामुळे देशात हळदीची लागवड ३ लाख २५ हजार ६११ हेक्टरवर झाली असून पाण्याच्या कमतरतेने हळदीच्या क्षेत्रात ५१ हजार हेक्टरने क्षेत्रात घट झाली. परंतु शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर हळद पीक साधले.
यंदाच्या हंगामातील हळदीची काढणी जानेवारीपासून सुरू झाली. त्यानंतर हळद काढणीला गती आली. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील हळद काढणी ७० टक्के उरकली आहे. तर तमिळनाडू या राज्यातील हळदीची काढणी ५० टक्के पूर्ण झाली आहे.
महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतील उर्वरित ३० टक्के हळदीची काढणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल. तर तामिळनाडू या राज्यातील ५० हळदीची काढणी एप्रिलच्या मध्यापर्यंत संपेल.
पाण्याच्या कमतरतेचा फटका
वास्तविक पाहता, हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर पावसाने दडी मारली. यामुळे ऐन पीक वाढीच्या काळात पाण्याची कमतरता भासल्याने त्याचा फटका हळद पीक वाढीला बसला.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यापासून हळद काढणीला गती आली. त्यानंतर हळदीचे उत्पादन किती हाती येते याचा अंदाज शेतकऱ्यांना आला. परिणामी उत्पादनात ३० टक्के घट होणार आहे, याचा अंदाज हळद संशोधन केंद्र आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.