Donkey Agrowon
ॲग्रो विशेष

Donkey Species : गाढवांच्या प्रजातीमधील आनुवंशिक विविधता

Article by Dr. Prajakta Jadhav, Dr. Balaji Hazare : आजही बांधकाम, शेती आणि कचरा व्यवस्थापन उद्योगांमध्ये गाढवांचा वाहतुकीसाठी वापर होतो. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संशोधनानुसार राज्यात मोठ्या प्रमाणात गाढवांच्या प्रजातीमध्ये आनुवंशिक विविधता आहे. या प्रजातींच्या संवर्धनासाठी विशेष उपक्रमाची गरज आहे.

Team Agrowon

Genetic Diversity of Donkey's : गेल्या काही वर्षांपासून गाढवांच्या संख्येचा कल आणि क्रमवारीत चढ-उतार होत आहेत. एकोणिसाव्या पशुगणनेच्या तुलनेत विसाव्या पशुधन गणनेत सर्व राज्यांमध्ये गाढवांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली दिसून येते.

भारतात घटलेली मागणी, अनियंत्रित आणि अपद्धतशीर प्रजनन, खराब आरोग्य आणि व्यवस्थापन पद्धती, बेकायदेशीर कत्तल, कमी उपयुक्तता, आणि चराऊ जमिनींची घट इत्यादी कारणांमुळे गाढवांची संख्या सतत कमी होत गेली आहे.

बांधकाम, शेती आणि कचरा व्यवस्थापन उद्योगांमध्ये गाढवांचा वाहतुकीसाठी वापर होतो. यांच्या संगोपनासाठी किमान देखभाल खर्च आवश्यक असतो. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असून उच्च ताण सहन करण्याची क्षमता देखील असते.

वीटभट्ट्यांमध्ये वाहतुकीसाठी गाढवांचा वापर प्रामुख्याने केला जातो. गाळयुक्त माती, नदी पात्रातून वाळू वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो. ज्या ठिकाणी वाहन पोहोचू शकत नाहीत अशा अरुंद रस्त्यावरून सामग्रीच्या वाहतुकीसाठी गाढव फायदेशीर ठरतात.

डोंगर, दलदल आणि पाणी साचलेल्या भागात वाहतुकीसाठी गाढवांचा प्रामुख्याने वापर केला जातो. राज्यात गाढव खरेदी- विक्रीसाठी माळेगाव (नांदेड), जालना, जेजुरी (पुणे) आणि मढी (नगर) येथे वर्षातून एकदा बाजार भरतो. माळेगाव हे मराठवाड्यातील गाढवांच्या व्यापाराचे मुख्य केंद्र आहे.

गाढवाची प्रजाती

बीड, जालना, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि हिंगोली यांच्या तुलनेत परभणी, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये गाढवांची संख्या अधिक आहे. या विभागात आढळणाऱ्या गाढवांचे वैशिष्ट्य म्हणजे राखाडी ते तपकिरी रंग व डोक्यापासून शेपटीपर्यंत पाठीवरची पृष्ठीय ठळकपणे दिसणारी काळी रेषा. डोळ्यांभोवती पांढरा रंग असतो, पोटावरील आणि पुढचे पाय आणि मागच्या पायांमधील भाग पांढरा असतो. खालच्या जबड्याच्या आसपासचा भाग देखील पांढरा असतो. कान चिन्हांकित गडद बाह्यरेखा दर्शविते.

एक प्रौढ गाढव ४० ते ८० किलो वजन सहजतेने वाहू शकतो. सरासरी एक गाढव १० किमी प्रति दिवस चालू शकते. दिवसातील ४ ते ६ तास काम करते. नदीच्या पात्रातून वाळू वाहून नेणे, विटा तयार करण्यासाठी गाळयुक्त मातीची वाहतूक, कृषी उत्पादने इ. च्या वाहतुकीसाठी वापर केला जातो.

गाढवांमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तनशीलता व आनुवंशिक विविधता आहे. मराठवाड्यातील गाढव पशुधन हे इतर राज्यांतील गाढवांपेक्षा वेगळे आहे असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. आनुवंशिक विविधता ही लोकसंख्येच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी एक सकारात्मक बाब असते, कारण ही विविधता बदलत्या पर्यावरणीय परिस्थितीमध्ये अनुकूलन आणि उत्क्रांतीसाठी पूरक असते.

या पशुधनांतील आनुवंशिक विविधता भरपूर असल्याने हे पशुधन दीर्घकाल टिकण्याची व वंशवृद्धी होण्याचे शक्यता देखील अधिक आहे. पशू अनुवंश व पशू प्रजनन शास्त्र विभागातील प्रकल्पामधून असे दिसून आले, की मराठवाड्यातील गाढव पशुधनाची प्रजात म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. यामुळे जनुकीय संसाधनाचे संवर्धन करता येईल.

डॉ. प्राजक्ता जाधव, ९८१९६६४७५१

(पशू अनुवंश व पशू प्रजनन शास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT