Donkey Market : मढीतील गाढवांच्या बाजारात यंदा फारशी उलाढाल नाही

Donkey Market Madhi : पाथर्डी तालुक्यातील मढी यात्रेचे वैशिष्ट्य असलेल्या गाढवांच्या बाजारात यंदा फारसे उलाढाल झाले नाही.
Donkey Market
Donkey MarketAgrowon
Published on
Updated on

Nagar News : पाथर्डी तालुक्यातील मढी यात्रेचे वैशिष्ट्य असलेल्या गाढवांच्या बाजारात यंदा फारसे उलाढाल झाले नाही. बाजारावर काही प्रमाणात मंदीचे सावट दिसून आले. यामुळे गाढव विक्रीस आणलेल्या व्यापाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटला.

राज्यात जेजुरी, देऊळगाव राजा, माळेगाव व मढी येथेच गाढवांचा बाजार भरतो. भटक्यांची पंढरी असलेल्या नगर जिल्ह्यातील मढी (ता. पाथर्डी) दरवर्षी रंगपंचमीनिमित्त श्री कानिफनाथ महाराज यांची यात्रा भरते.

Donkey Market
Donkey Farm : 'या' राज्यात उभारला देशातील सर्वात मोठा गाढवांचा फार्म

देशभरातून कानिफनाथाच्या समाधी दर्शनासाठी भाविक येतात. येथील गाढवाचा बाजारही शेकडो वर्षांपासून प्रसिद्ध आहे. मढीच्या बाजारात काठेवाडी व गावरान अशा दोन प्रकारची गाढवे विक्रीस येत असली, तरी यंदा बाजारात फारशी उलाढाल झाली नसल्याचे दिसून आले आहे.

मागील वर्षांपासून जिल्ह्यातील बेलापूर येथील गाढवांचा व्यापारी आकाश बाबासाहेब बोरुडे हा पंजाबमधील गाढवे बाजारात विक्रीस आणतो. मागील वर्षी दोन, तर चालू वर्षीही दोन पंजाबी गाढव त्याने विक्रीस आणली होती. मागील वर्षी आणलेली दोन्ही गाढवे विकली गेली होती. मात्र चालू वर्षी सायंकाळपर्यंत ही गाढवे विकली गेली नव्हती.

या गाढवांची उंची पाच फूट आहे. काठेवाडी गाढवे ही मुख्यतः गुजराती व्यापारी घेऊन येतात. चालू वर्षी केवळ पन्नासच काठेवाडी गाढवे बाजारात आली होती. ही सर्व गाढवे दुपारपर्यंत तीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत विकली गेली, तर जवळपास तीनशे गावरान गाढवे बाजारात विक्रीसाठी आली होती.

Donkey Market
Donkey Milk : धारावीत चमचाभर दुधासाठी मोजावे लागतात ५० रूपये

मात्र या बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने गावरान गाढवांच्या बाजारात अपेक्षित उलाढाल झाली नाही. गाढवांच्या किमती मागील वर्षाच्या तुलनेत वाढल्याने विक्री कमी झाल्याचे व्यापारी हिरामण गायकवाड या व्यापाऱ्याने सांगितले. जी गावरान गाढवे विकली गेली. त्याची किंमत पंधरा ते तीस हजार रुपयांपर्यंत असल्याचे व्यापारी मेहबूब मदारी यांनी सांगितले.

काही व्यापाऱ्यांचा खर्चही निघाला नाही

दिवसेंदिवस मशिनरीचा वापर वाढल्याने गाढवांचे महत्त्व कमी झाले असल्याने पूर्वीच्या प्रमाणात आता गाढवे विकली जात नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. काही व्यापाऱ्यांना बाजारात गाढवे आणण्यासाठी जो खर्च सोसावा लागला त्याची भरपाई सुद्धा मिळाली नाही. गाढवांच्या बाजारातून मढी ग्रामपंचायतीला चांगले उत्पन्न दरवर्षी मिळत असते. मात्र चालू वर्षी अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com