Ber Fruit Agrowon
ॲग्रो विशेष

Ber Fruit : पंढरपुरात भाविकांकडून गावरान बोरांना पसंती

Pandharpur Vithhal Darshan : मार्गशीर्ष महिना सुरू असल्यामुळे श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला भाविकांची दररोज गर्दी होत आहे.

Team Agrowon

Pandharpur News : मार्गशीर्ष महिना सुरू असल्यामुळे श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला भाविकांची दररोज गर्दी होत आहे. पंढरीत आलेल्या या भाविकांना थंडीच्या हंगामात मिळणाऱ्या पेरू व विविध जातींची चविष्ट बोरे या गावरान मेव्याने भुरळ घातली आहे.

प्रदक्षिणा मार्गावरील हातगाड्यांवर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून आंबट गोड अशा बोरांचा आस्वाद घेत भाविक गावरान मेवा खरेदी करताना दिसून येत आहेत. जिल्ह्यातील शुष्क हवामानामुळे विविध जातींची बोरे व पेरू या फळांचे उत्पादन शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सध्या या फळांचा हंगाम सुरू असल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर या फळांची आवक सुरू आहे.

पेरूमध्ये व्हीएनआर, तैवान पिंक, सरदार, जय विलास, तर बोरांमध्ये उमराण, चमेली, चेकनट, कडाका, ॲपल बोर या विविध जातींचा समावेश आहे. दररोज सकाळी होणाऱ्या लिलावामध्ये ही फळे विकत घेतल्यानंतर येथील फळ विक्रेते पंढरीतील प्रदक्षिणामार्ग, गजानन महाराज मठ परिसर, प्रमुख चौक आदी ठिकाणी हातगाड्यांवर या फळांची विक्री करताना दिसून येत आहे.

श्री विठ्ठलाचे दर्शन झाल्यानंतर भाविक प्रासादिक वस्तूंच्या खरेदी बरोबरच हातगाड्यांवर मिळणाऱ्या आंबट गोड अशा पेरू व बोरांचा आस्वाद घेत खरेदी करतानाचे दृश्य सध्या पाहावयास मिळत आहे. पेरू ६० ते १०० रुपये, तर बोरे ४० ते ८० रुपये प्रति किलो या भावाने विक्री होत आहेत.

आम्ही मुंबई येथील घाटकोपरमधील आहोत. दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरात फेरफटका मारताना आम्हाला हातगाडीवर मिळणाऱ्या बोरांची चव अत्यंत आवडली. आम्ही प्रत्येकाने किमान एक किलो तरी बोर खरेदी केली आहेत.
- नीलम सुनील वायकर, भाविक, मुंबई

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT