Swapnil Shinde
पंढरपूर हे दक्षिण भारतातील काशी आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणजे पंढरपूर आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाणा राज्यांतील लाखो वारकऱ्यांचे विठ्ठल हे दैवत आहे. आषाढी आणि कार्तिक वारीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते
भाविकांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने विठ्ठल मंदिरातील आतल्या भागातील विकासासाठी ७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
पंढरपूर शहर आणि परिसरासाठी एकूण २७०० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करत आला आहे.
मागील वर्षी मंदिर परिसरात रुंदीकरणाला विरोधला मंदिर परिसरातील व्यापारी आणि नागरिक उठून बसले. यासाठी त्यांनी एक दिवसाचा बंद देखील पाळला होता
२७०० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यासाठी अंतिम मंजुरीसाठी पालकमंत्री विशेष बैठक घेणार आहे.
या बैठकीत पंढरपूर येथील सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन काम सुरू होईल, असे शासनाकडून सांगण्यात येत आहे
विकास आराखड्यामध्ये पंढरपूर शहरालगतच्या गोपाळपूर , शिरढोण , टाकळी , शेगाव दुमाला, वाखरी , कोर्टी आणि कासेगाव या गावांचा नगरपालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे