Pandharpur Development Plan : विकास आराखड्यात भावनांचा विचार करा

Development Plan : पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करताना वारकरी, भाविक, व्यापारी, नागरिक अशा सर्व घटकांच्या भावनांचा विचार करावा, अशा सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी (ता. २०) येथे दिल्या.
Pandharpur Development Plan
Pandharpur Development PlanAgrowon
Published on
Updated on

Solapur News : पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करताना वारकरी, भाविक, व्यापारी, नागरिक अशा सर्व घटकांच्या भावनांचा विचार करावा, अशा सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी (ता. २०) येथे दिल्या.

सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या.

या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, पंढरपूरचे मुख्याधिकारी अरविंद माळी, देवस्थान समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औंसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सुनील उंबरे उपस्थित होते.

Pandharpur Development Plan
Development Plan : विकास आराखड्यात कच्चे दुवे अधोरेखित करा

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, की मंदिर विकासासाठी मंजूर केलेल्या ७३ कोटी रुपयांच्या निधीमुळे श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर व पंढरपूरच्या विकासाला चालना मिळणार आहे. या निधीतून मंदिराचे प्राचीन सौंदर्य उजळून निघेल. त्याचबरोबर मंदिराचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. या निधीचा सुयोग्य वापर करावा.

या तरतुदीमुळे संत विद्यापीठ, वारकऱ्यांना आरोग्य सुविधा, भक्त निवास अशा प्रलंबित विषयांना गती मिळणार आहे, तसेच शिर्डी प्रमाणे पंढरपूरला स्वतंत्रपणे विमानतळासाठी प्रस्तावावर कार्यवाही करावी. जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे यांनी सादरीकरण केले. संजय माळी, गजानन गुरव, अरविंद माळी यांनी माहिती दिली.

काॅरिडोरऐवजी प्रतिपंढरपूर संकल्पना हवी

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, की पंढरपूर कॉरिडॉरऐवजी प्रति पंढरपूर ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवावी. स्थानिक नागरिकांना विश्‍वासात घेऊन विकास आराखडा अंतिम करावा. कोणावरही अन्याय होऊ न देता, सर्व घटकांना समाविष्ट करून घ्यावे.

नागरिकांनाही सहकार्याची भूमिका घ्यावी. पंढरपूर विकास आराखडा तयार करताना जुन्या वास्तू, स्मारकांचा आदर राखला जाईल, याची विशेष दक्षता घ्यावी. कॉरीडोरबाबत गैरसमज दूर करणारे व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसारित करावेत, असे त्यांनी सूचित केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com