Solapur News : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मागच्या महिन्यातच राज्य सरकारने राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी सात हजार ५०० कोटींचे कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील ऱखडलेल्या एकरुख, शिरापूर, आष्टी व बार्शी या उपसा सिंचन योजनांना निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नाबार्डकडून १५ हजार कोटींचे दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात त्यापैकी सात हजार ५०० कोटींचे कर्ज घेण्यास राज्य सरकारने मागच्या महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे.
नाबार्डकडून मंजुरीनंतर यातून सोलापूर जिल्ह्यातील चार उपसा सिंचन योजनांसह ७५ अपूर्ण प्रकल्पांना पाच हजार कोटी रुपये मिळणार आहेत. तर उर्वरित दोन हजार ५०० कोटी रुपये १५५ सिंचन प्रकल्पांच्या कालवे व वितरण प्रणाली सुधारण्यासाठी देण्यात येणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील एकरुख, शिरापूर, आष्टी या तीनही उपसा सिंचन योजनांची कामे बऱ्यापैकी पूर्ण झाली आहेत. मात्र, वितरण व्यवस्थेची कामे सुरू आहेत.
बार्शी उपसा सिंचन योजनेची वितरण व्यवस्थेची कामे सुरू असली, तरी ती पूर्ण होण्यास जून २०२५ पर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. एकरुख, शिरापूर, आष्टी या योजनांसाठी आणखी ४० ते ५० कोटी तर बार्शी योजनेसाठी आणखी २०० कोटींची आवश्यकता होती. पण या निर्णयामुळे हे विषय मार्गी लागतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
जिल्ह्यातील एकरुख, शिरापूर, आष्टी व बार्शी उपसा सिंचन योजनांच्या वितरण व्यवस्थेची कामे सुरू आहेत. राज्य सरकारने या सिंचन योजनांसाठी निवडणुकीआधीच निधीची तरतूद केली आहे. आता नाबार्डच्या कर्जातूनही निधी मिळणार आहे. त्यामुळे या योजनांच्या कामांसाठी निधी कमी पडणार नसल्याने ती मार्गी लागतील.ज्ञानदेव बागडे, अधीक्षक अभियंता, भीमा कालवा, सोलापूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.