Irrigation Scheme : सतरा जलसिंचन योजनांना तीन कोटींचे अनुदान

Subsidy For Irrigation Scheme : राज्यातील १७ उपसा सहकारी जलसिंचन योजनांना तीन कोटी पाच लाख रुपयांचे अनुदान राज्य सरकारने मंजूर केले आहे.
Agriculture Irriation
Agriculture IrriationAgrowon

Mumbai News : राज्यातील १७ उपसा सहकारी जलसिंचन योजनांना तीन कोटी पाच लाख रुपयांचे अनुदान राज्य सरकारने मंजूर केले आहे. शासनाव्यतिरिक्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी उपसा जलसिंचन योजना राबविल्या, मात्र त्या आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने त्यांना हातभार लावण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येते. त्यानुसार २०२३-२४ च्या आर्थिक वर्षासाठी हे अनुदान मंजूर केले आहे.

राज्यातील सहकारी उपसा जलसिंचन योजनांच्या प्रकल्प खर्चात गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे अल्प आणि सीमांत शेतकरी सभासदच नव्हे तर मध्यम व मोठ्या शेतकऱ्यांना सुद्धा वाढता प्रकल्पखर्च पेलवत नाही.

Agriculture Irriation
Agriculture Irrigation : वीजनिर्मितीचे १२ टीएमसी पाणी सिंचनासाठी राखीव ठेवा

शासनाच्या खर्चाने ज्या लहान मोठ्या पाटबंधारे योजना हाती घेण्यात आल्या, त्या योजनांच्या लाभक्षेत्रात कोणत्याही खर्चाशिवाय सिंचन व्यवस्था करण्याचे ठरविल्यास त्याचा योजनांचा संपूर्ण खर्च त्यांना स्वतः: करावा लागतो.

त्यामुळे उपसा जलसिंचन योजनांच्या लाभधारक सभासदांवरील खर्चाचा बोजा कमी करून तो काही प्रमाणात शासनाकडून उचलला जावा, यासाठी १९९४ पासून जलसिंचन योजनांना अनुदान स्वरूपात अर्थसाहाय्य केले जाते. त्यानुसार हे अनुदान मंजूर केले आहेत.

या अनुदानासाठी उपसा जलसिंचन संस्थांना देण्यात आलेली मंजुरी, प्रस्तावाबरोबर सहकार आयुक्तांकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांत विसंगती आढळल्यास अनुदान व्याजासह वसूल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सिंचन योजनेने प्रकल्प खर्चासाठी ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे, त्या बँकेच्या नावाने धनादेश काढण्यात येणार आहे. ही रक्कम कर्जाच्या रकमेपोटी समायोजित करण्यात येणार आहे.

Agriculture Irriation
Agriculture Irrigation : शेतीसाठी जिहे-कठापूरचे आवर्तन सुरू करा

...या सहकारी पाणीपुरवठा संस्थांना अनुदान

संस्थचे नाव-अनुदान रक्कम

-श्री दत्त, बुधगवा, मिरज-१ लाख ९६ हजार ३०२ (एकूण अनुदान २१ लाख ५८ हजार २५०)

- श्री दत्त ठिबक जलसिंचन, रुईखेल, ता. श्रीगोंदा-१० लाख ७० हजार ९००

- कै. खासदार बाळासो माने शं. माने उपसा जलसिंचन, माले, हातकणंगले-१५ लाख ७५ हजार ७१०

- श्री एकवीरा देवी, देवाळे, ता. करवीर-३७ लाख ६३ हजार ४४८

- श्री जय गणेश, आष्टा, ता. वाळवा-१४ लाख ९५००

- पांडुरंग, मुडशिंगी, ता. हातकणंगले-१६ लाख ८५ हजार

- अरविंद पाटील, वसगडे, ता. पलुस-२५ लाख ५६ हजार ७७१

- भावेश्वरी, गोरंबे, ता. कागल-१३ लाख ८९ हजार २५०

- शिवशांती, आष्टा-१३ लाख २१ हजार

- चौंडेश्वरी, आष्टा, ता. वाळवा-२७ लाख ५० हजार

- भैरवनाथ, फाळकेवाडी, वाळवा-१६ लाख

- आनंद, आष्टा-१६ लाख ९ हजार

- भैरवनाथ, अंबपवाढी, हातकणंगले-७ लाख २७ हजार ९५३

- श्री महालक्ष्मी, कसबा सांगाव, ता. कागल-१५ लाख ७१ हजार ६७५

- जोतिर्लिंग, बिऊर, शिराळा-८ लाख ९३ हजार २५०

- हनुमान, वसगडे, पलूस-२१ लाख ९२ हजार ६०६

- भैरवनाथ, गाताडवाडी, वाळवा- १३ लाख ९९१ (मंजूर निधी ६३ लाख ११ हजार ८८७)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com