Well Irrigation : वाशिम जिल्ह्यातील तीन तालुक्यात १०० टक्के सिंचन विहिरींना मंजुरी

Irrigation Scheme : सिंचन विहिरींचे प्रशासकीय मंजुरीचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य केल्यामुळे जिल्ह्यातील मानोरा, मंगरूळपीर, कारंजा या तीन तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
Well
Well Agrowon

Washim News : सिंचन विहिरींचे प्रशासकीय मंजुरीचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य केल्यामुळे जिल्ह्यातील मानोरा, मंगरूळपीर, कारंजा या तीन तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि ‍जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या हस्ते गौरव झाला.

मानोरा तालुका गट विकास अधिकारी गजानन पिल्लेवाड, मंगरूळपीरचे रवींद्र सोनोने आणि कारंजाचे प्रफुल्ल तोटावाड यांचा यात समावेश आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना ‍जिल्हा प्रशासन प्राधान्य देत आहे. यामध्ये सिंचन विहिरींच्या कामांचा प्रामुख्याने समावेश आहे.

Well
Agriculture Irrigation : ‘अक्कलपाडा’च्या कालव्यांतून दोन दिवसांत आवर्तन

जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये सिंचन विहिरींचे प्रशासकीय मंजुरीचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य झाले. मानोरा तालुक्यात १९२५ विहिरींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २४१२ विहिरींना प्रशासकीय मंजुरी देत १२५ टक्के काम झाले. मंगरूळपीरमध्ये १९०० उद्दिष्ट असताना २२०० विहिरी झाल्या. हे ११५ टक्के काम आहे. तर कारंजा तालुक्यात २२७५ उद्दिष्ट असताना २२५० म्हणजेच ९९ टक्के उद्दिष्ट्यपूर्ती झाली.

Well
Agriculture Irrigation : वीजनिर्मितीचे १२ टीएमसी पाणी सिंचनासाठी राखीव ठेवा

मागेल त्याला विहीर ः बुवनेश्वरी एस.

शासनाच्या वतीने एका गावात १५ सिंचन विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ते वाढवून प्रत्येक गावांना २५ विहिरींचे उद्दिष्ट दिले आहे. त्याचसोबत जो शेतकरी मागणी करेल त्यांना विहीर मंजूर करण्याचे अधिकार गट ‍विकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला, असे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी म्हटले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : वाघमारे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींचा लाभ ‌घ्यावा आणि ज्या विहिरींना प्रशासकीय मान्यता दिली त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन‍ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले आहे. तसेच मागे राहिलेल्या तालुक्यामधील उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित गट विकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com