Sugarcane FRP Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : सोलापुरात ७३ कोटी रुपयांची एफआरपी थकित

Sugarcane Season : सोलापुर जिल्ह्यात नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत गाळप झालेल्या उसापोटी जिल्ह्यातील ११ कारखान्यांकडे ७३.२ कोटी रुपये एफआरपी थकीत आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापुर जिल्ह्यात नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत गाळप झालेल्या उसापोटी जिल्ह्यातील ११ कारखान्यांकडे ७३.२ कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. विविध शेतकरी संघटनासह वैयक्तिक शेतकरीही कारखान्यांकडे त्यासाठी पाठपुरावा करत आहेत. पण वायद्यावर वायदे कारखान्यांकडून सांगितले जाते आहेत.

सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील पहिल्या पंधरवड्यात ३३ कारखान्यांनी १७ लाख ३७ हजार ९४३ टन उसाचे गाळप केले. कारखान्यांनी त्याचे ३८७.७६ कोटी रुपये शेतकऱ्यांना ऊसबिलाच्या स्वरूपात दिले आहेत.

२२ कारखान्यांनी बेसिक रिकव्हरीप्रमाणे १०० टक्के एफआरपी दिली आहे. भैरवनाथ शुगरच्या विहाळ, लवंगी व आलेगाव येथील युनिट्स, युटोपियन, धाराशिव (सांगोला) या कारखान्यांनी पहिल्या पंधरवड्यातील

एक रुपयाही शेतकऱ्यांना दिला नाही. तर लऊळच्या संत कुर्मदास कारखान्याने ३९.५८ टक्के, बीबीदारफळच्या लोकमंगल साखर कारखान्याने ५५.६० टक्के, बार्शीच्या इंद्रेश्वर शुगरने १४.८० टक्के, तर माढ्यातील बबनरावजी शिंदे कारखान्याने २७.४७ टक्के एफआरपी दिली आहे.

आता जादा ऊसदर कसा परवडतो?

पाणी टंचाईमुळे या वर्षी उसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. त्यामुळे कारखान्यांना उसासाठी धावाधाव करावी लागत आहे. परिणामी, ऊस खेचण्यासाठी कारखान्यांमध्ये पहिला हप्ता देण्याची स्पर्धा सुरू आहे. काही कारखान्यांनी उसाचा पहिला हप्ता २८०० रुपये व त्यापेक्षा अधिक जाहीर केला आहे.

काही कारखाने पहिला हप्ता २६०० ते २७०० रुपये देत आहेत. शेजारच्या जिल्ह्यातील काही कारखाने तर २९०० रुपये पहिला हप्ता येऊन उसाची पळवापळवी करत आहेत. ऊसटंचाईमुळे कारखान्यांना या वर्षी उसाचा पहिला हप्ता जादा देणे परवडते आहे. मग गतवर्षी तो जादा का दिला नाही, असा सवाल उपस्थित जात आहे.

कारखान्यांनी किमान पहिल्या पंधरवड्यातील ऊसबिले शेतकऱ्यांना द्यायला हवी होती. साखर आयुक्तांकडे आपण याबाबत तक्रार करून ही बाब निदर्शनास आणणार आहोत.
राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

३० नोव्हेंबरअखेर कारखानानिहाय थकीत असलेली एफआरपी (कोटीत)

कारखाना थकीत एफआरपी

१) सिद्धेश्वर (कुमठे) -१.८३

२) संत कुर्मदास (लऊळ) -४.५७

३) लोकमंगल (बिबीदारफळ) ०.७१

४) लोकमंगल (भंडारकवठे) २.८३

५) इंद्रेश्वर शुगर (बार्शी) ५.१५

६) भैरवनाथ (विहाळ) ७.९५

७) भैरवनाथ (लवंगी) ९.३६

८) युटोपियन (मंगळवेढा) ९.५८

९) भैरवनाथ (आलेगाव) २.१५

१०) बबनरावजी शिंदे (माढा) २३.८२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT