FRP Sugarcane Rate
FRP Sugarcane Rateagrowon

Sugarcane FRP : ‘भीमाशंकर’चा पहिला हप्ता ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा ; एकूण २७ कोटी ५० लाख रुपये वर्ग

Bhimashankar Sugar Factory : भिमाशंकर कारखान्याने एफआरपीपेक्षा वाढीव रक्कम ३५० रुपये प्रती मेट्रिक टन अंतिम हप्त्याचे स्वरूपात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली आहे.
Published on

Pune News : पारगाव, ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने संस्थापक-संचालक व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केल्याप्रमाणे व बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पूजन कार्यक्रमात दिलेल्या शब्दाप्रमाणे अंतिम हप्ता रक्कम ३०० रुपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे एकूण २७ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम बुधवारी (ता.२५) ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

FRP Sugarcane Rate
Sugarcane Rate : साखर कारखानदारांकडून ऊसदराची कोंडी फोडण्याचा प्रयत्न, चार कारखान्यांकडून दर जाहीर

गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या एकूण ९ लाख १९ हजार ९८३ मेट्रिक टनासाठी कारखान्याने यापूर्वी एफआरपीनुसार प्रती मेट्रिक टनाप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केलेली आहे.

अंतिम दर ३,१०० रुपये प्रती मेट्रिक टन जाहीर केल्याप्रमाणे अंतिम हप्ता ३५० रुपयांमधून भाग विकास निधी ५० रुपये प्रती मेट्रिक टनामागे वजा जाता उर्वरित ३०० रुपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे होणारी रक्कम २७ कोटी ५० लाख रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत डिस्टीलरी प्रकल्प कार्यान्वित झालेला नसतानाही चांगला ऊस दर दिल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कारखान्याने एफआरपीची रक्कम वेळेत दिलेलीच आहे. याशिवाय एफआरपीपेक्षा वाढीव रक्कम ३५० रुपये प्रती मेट्रिक टन अंतिम हप्त्याचे स्वरूपात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली आहे.

गाळप हंगाम २०२३-२४ करिता उपलब्ध ऊस गाळपाची तयारी झालेली असून कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देऊन पूर्वीप्रमाणेच सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com