Drone Training  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Drone : नगर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांना मोफत ड्रोन प्रशिक्षण

Drone Training : शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तरुण शेतकऱ्यांनी शेती करावी यासाठी तरुण शेतकऱ्यांना ड्रोन चालवण्यासह अन्य बाबींच्या माहिती मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Team Agrowon

Nagar News : शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तरुण शेतकऱ्यांनी शेती करावी यासाठी तरुण शेतकऱ्यांना ड्रोन चालवण्यासह अन्य बाबींच्या माहिती मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे. कृषी विकास संस्था आणि माफाउंडेशनच्या या उपक्रमाला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला.

पारंपरिक शेती करण्याऐवजी आता तांत्रिक, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी यासाठी सरकारी पातळीवर अवाहन केले जाते. शेतीत फवारणी व अन्य बाबीसाठी ड्रोनचा वापर महत्त्वाचा मानला जात असून त्यासाठी तरुण शेतकऱ्यांना प्रशिक्षणातून पूरक माहिती मिळावी यासाठी कृषी विकास संस्था आणि माफाऊंडेशनकडून मोफत ड्रोन प्रशिक्षण देण्यात आले.

या वेळी झालेल्या कार्यक्रमाला म.हात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. जी. के. ससाणे, कृषी अवजारे संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. तुळशीदास बास्टेवाड, मकरंद कोरडे, आदीनाथ चंद्रेपाटील यांच्यासह इतर उपस्थित होते. महाफाऊंडेशनचे संचालक ओंकार आगळे पाटील उपक्रमाची माहिती दिली.

या वेळी ग्रामीण भागातील तरुणांना नावीन्यपूर्ण मार्गाने रोजगाराची उपलब्धता करून देण्यासाठी महाफाऊंडेशन काम करत असून, आगामी काळात प्रत्येक गावात एक तरुण कृषी ड्रोन उद्योजक तयार करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.

या माध्यमातून गावागावांतील शेतकऱ्यांना फवारणीचे ओझे वाटू नये, रासायनिक औषंधापासून शेतकऱ्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे व कमी वेळात आणि योग्य वेळी पिकांना फवारणी देऊन उत्पादन क्षमता वाढवावी असे तरुण शेतकऱ्यांना अवाहन केले.

कोपरगाव येथील प्रगतिशील शेतकरी संतोष शिंदे, नेवासा येथील संदीप शेंडे, लक्ष्मण बर्डे यांनी उपस्थित युवा शेतकऱ्यांना कृषी ड्रोन व ड्रोन फवारणी व्यवसायाच्या माध्यमातून उद्योजकता बाबत माहिती दिली.

ड्रोन व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक फवारणीची सेवा देऊन महिन्याकाठी १ ते १.५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचा अनुभव नेवासा येथील विशाल करडक यांनी ग्रामीण भागातील युवकांनी स्वयंरोजगारासाठी ड्रोन फवारणी व्यवसाय सुरु करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन कृष्णा बेलगावकर यांनी केले तर आदिनाथ चंद्रे पाटील यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT