Agriculture Drone : पिकांवर फवारणीसाठी ड्रोनच्या वापराकडे शेतकऱ्यांचा कल

Drone Spraying : आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती अवजारांना फाटा देत आधुनिक अवजारे वापरण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.
Agriculture Drone
Agriculture Drone Agrowon
Published on
Updated on

Pune News : आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती अवजारांना फाटा देत आधुनिक अवजारे वापरण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. पाठीवर जड फवारणी पंप घेऊन फवारणी करण्यापेक्षा ड्रोनच्या माध्यमातून फवारणीसाठी शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे.

एक एकर क्षेत्रातील पिकाची फवारणी करण्यासाठी पंपाद्वारे सव्वा तास कालावधी लागतो. ड्रोनच्या माध्यमातून आठ मिनिटांत फवारणी होते. त्याबरोबरच कीटकनाशकाची, पैशांची व वेळेची बचत होत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. केंद्र सरकारच्या राजगुरुनगर (ता. खेड) येथील कांदा व लसून संशोधन संचालनालयामार्फतही याबाबत शेतकरी जनजागृतीचे काम सुरू आहे.

Agriculture Drone
Agriculture Drone : शेतीकामी ड्रोनला खरेदीदार मिळेना

सध्या आंबेगाव, खेडमध्ये बटाटे, सोयाबीन व अन्य पिकांच्या फवारणीसाठी ड्रोनचा वापर वाढत आहे. याबाबत शेतकरी भाऊसाहेब सावंत म्हणाले, की मशागतीसाठी लागणारे कुळव, नांगर, पाभार आदी अवजारांऐवजी ट्रॅक्टरचा व आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या अवजारांचा वापर करत आहे.

Agriculture Drone
Soybean Drone Spraying : पाच एकरांवरील सोयाबीनची फवारणी अवघ्या दोन तासांत

फवारणी करण्यासाठी पंधरा-वीस किलो वजनाचा फवारणी पंप घेऊन संपूर्ण शेतात पायपीट करावी लागते. यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ जातो. शारीरिक थकवा येतो. या त्रासातून शेतकऱ्यांची आता सुटका होणार असून नजीकच्या काळात ड्रोन वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे.

सोयाबीन पीक अडीच फूट उंचीचे झाले आहे. पाठीवर फवारणी पंप घेऊन शेतात फिरावे लागत होते. ड्रोनद्वारे फवारणी केल्यामुळे विंचू, काटा, सापांची भीती दूर झाली आहे. वेळ, पैसा व शारीरिक कष्ट वाचले आहेत.
- विशाल तोडकर, शेतकरी, पेठ
पारंपरिक पद्धतीने पाठीवर पंप घेऊन प्रतिबंधात्मक औषध फवारणीसाठी एक एकर क्षेत्रासाठी पाच ते सहा टाक्या लागतात. तब्बल सव्वा तास वेळ लागतो. हेच काम ड्रोनद्वारे सात ते आठ मिनिटांमध्ये पूर्ण होते. ड्रोनद्वारे एकरी ७०० ते ८०० रुपये फवारणीचा खर्च येतो.
- अशोक विठ्ठल राक्षे, शेतकरी, पेठ
राजगुरुनगर (ता. खेड) येथील कांदा व लसून संशोधन संचालनालय यांच्या वतीने ७०० एकर क्षेत्रात ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक व संशोधन मोफत करण्यात आले आहे. ड्रोनद्वारे चांगल्या पद्धतीने कशी फवारणी करता येईल, कीड व रोग नियंत्रण कसे करता येईल, याबाबत संशोधन सुरू आहे. नजीकच्या काळात कमी खर्चात व कमी कालावधीत पिकाची फवारणी अडचणीच्या ठिकाणी करणे शेतकऱ्यांना सुलभ होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यांत ड्रोनद्वारे फवारणीचा वापर व्हावा म्हणून शेतकरी वर्गात जनजागृती काम सुरू आहे.
- डॉ. राजू काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ कांदा व लसून संशोधन संचालनालय राजगुरुनगर, ता. खेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com