Sugarcane Season  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : पुणे जिल्ह्यातील चार कारखाने बंद

Sugarcane Crushing : आतापर्यंत जिल्ह्यातील चार साखर कारखाने बंद झाले आहेत. चालू महिन्यात सर्व साखर कारखान्यांचा गळीत हंगाम बंद होईल.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्यातील हंगाम अंतिम टप्यात आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी आपला गळीत हंगाम आटोपण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील चार साखर कारखाने बंद झाले आहेत. चालू महिन्यात सर्व साखर कारखान्यांचा गळीत हंगाम बंद होईल. त्यामुळे ज्या कारखान्यांचा गळीत हंगाम बंद झाला आहे, अशा कारखान्यावरील तोडणी मजूर परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.

वाढत्या उन्हाच्या चटक्यामुळे साखर कारखाने गळीत हंगाम लवकर संपवू लागले आहेत. त्यातच वाढत असलेली पाणी टंचाईची तीव्रता व जनावरांसाठी आवश्यक चाऱ्याची स्थिती बघता एप्रिलअखेरीस साखर कारखाने बंद होतील.

या सर्व साखर कारखान्यांनी गेल्या चार महिन्यांपूर्वी उसाचा गाळप हंगाम सुरू केला होता. यंदा गळीत हंगामात सुमारे १४ साखर कारखाने सुरू झाले होते. ऊस तोडणी मजूर गावाकडून येऊन पाच ते सहा महिने ऊस तोडणीचे काम करत आहेत.

जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाईची झळ वाढू लागली आहे. त्यामुळे उसासह सर्वच पिकांना पाण्याचा फटका बसू लागला आहे. कारखान्यांनाही ऊस मिळण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. जिल्ह्यात एकूण सहकारी ९ व खासगी पाच साखर कारखाने सुरू झाले होते.

या साखर कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता अडीच ते आठ हजार मेट्रिक टन आहे. अजून १५ ते २० दिवस साखर कारखाने चालतील, अशी शक्यता आहे. मात्र, राज्यात गेल्या महिन्यापासून साखर कारखाने बंद होण्यास सुरवात झाली आहे.

परंतु जिल्ह्यात उसाचे प्रमाण बघता काही प्रमाणात उशिराने बंद होतील, असा अंदाज होता. त्यानुसार २८ फेब्रुवारी रोजी इंदापुरातील नीरा-भीमा हा पहिला साखर कारखाना बंद झाला. तर ५ मार्च रोजी कर्मयोगी शंकरराव पाटील, २३ मार्च रोजी श्रीनाथ म्हस्कोबा, बारामती अॅग्रो बंद झाले आहेत.

सव्वा कोटी टन उसाचे गाळप

जिल्ह्यात सर्व साखर कारखान्यांनी आतापर्यंत एक कोटी २५ लाख १२ हजार ९२६ टन उसाचे गाळप केले. त्यापोटी एक कोटी ३० लाख ७९ हजार ६६५ क्विटंल साखरेचे उत्पादन केले आहे. साखर उतारा १०.४५ टक्के एवढा आहे.

यात सहकारी साखर कारखान्यांनी ६७ लाख ४ हजार ७४ टन उसाचे गाळप केले. त्यापोटी ७३ लाख ८५ हजार ६२० क्विटंल साखरेचे उत्पादन केले. साखर उतारा ११.०२ टक्के आहे. खासगी कारखान्यांनी ५८ लाख ८ हजार ८८२ टन उसाचे गाळप केले. त्यापोटी ५६ लाख ९४ हजार ४५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर ९.८ टक्के साखर उतारा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT