Sugarcane Harvesting Season : राज्यातील उसाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्याकडे, ७३ कारखान्यांचे धुराडे बंद

Sugarcane Harvesting : राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे. तसेच मागच्या वर्षीच्या आसपास यंदाचे साखर उत्पादनही झाले आहे.
Sugarcane Harvesting Season
Sugarcane Harvesting Seasonagrowon

Sugar Price : मागच्या ४ महिन्यांपासून सुरू असलेला राज्यातील उसाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. अवघा तीन महिन्यात उसाचा गळीत हंगाम संपेल अशी तज्ज्ञांकडून बोलले जात होते परंतु मार्च अखेरपर्यंत यंदाचा हंगाम जाण्याची शक्यता कारखानदारांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे. तसेच मागच्या वर्षीच्या आसपास यंदाचे साखर उत्पादनही झाले आहे. राज्यभरात १ हजार १२ लाख टन उसाचे गाळप झाले तर १ हजार २८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ मार्चअखेरपर्यंत राज्यातील ७३ साखर कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे. यामध्ये पुणे, सोलापूर आणि बहुतांश मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी आपला हंगाम आटोपता घेतला आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यातील बहुतांश साखर कारखाने उसाच्या उपलब्धतेमुळे गाळप थांबवतील अशी शक्यता आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जाण्याची शक्यता आहे.

सध्या अनेक साखर कारखान्यांनी आपले गाळप बंद केले असून मार्च अखेरपर्यंत राज्यातील बहुतांश म्हणजे ९० टक्के कारखाने आपले गाळप बंद करतील अशी शक्यता आहे. यंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते परंतु मागच्या वर्षीच्या तुलनेत सरासरी झाले आहे. इथेनॉल निर्मितीवर बंधने घातल्यामुळे साखरेचे उत्पादन वाढल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

Sugarcane Harvesting Season
Sugar Commissioner : कुणाल खेमनार यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती, राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या

मार्चसाठीचा साखर कोटा जाहीर

केंद्र सरकारने मार्चसाठी देशातील साखर कारखान्यांना २३.५ लाख टनांचा कोटा जाहीर केला आहे. गेल्या वर्षी मार्चच्या तुलनेत हा कोटा दीड लाख टनांनी जादा आहे. संभाव्य उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्राने हा कोटा वाढवून दिला आहे. कोटा जादा दिल्याने याही महिन्यात साखर कारखान्यांना साखर विक्री करणे आव्हानात्मक ठरणार आहे.

फेब्रुवारीमध्ये २२ लाख टनांचा कोटा दिला होता. या महिन्यात साखरेला चांगली मागणी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फारशी मागणी नाही यामुळे दरात फार वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

गेल्या दोन महिन्यांत साखरेच्या दरात मंदी आहे. संक्रांतीनंतर दर ३४०० रुपये क्विंटलच्या आसपास राहिले. उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शीतपेय व मिठाई उद्योगाकडून साखरेला सातत्याने मागणी असते. यामुळे साखरेची उलाढाल मोठी असते. यंदा मात्र साखर बाजारात फारशी तेजी दिसत नसल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com