Water Shortage Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Chandrapur Water Issue : चंद्रपूर जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टर क्षेत्र तहानलेले

Cotton Farming : मागील वर्षी एक ते १६ जून या कालावधीत २८.९ मिमी पाऊस झाला होता. त्या कालावधीत कापसाच्या ७५० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या. मात्र यंदा बिकट परिस्थिती आहे.

Team Agrowon

Chandrapur Rain News : पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगामातील चार लाख ९० हजार ४५० हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. केवळ ओलिताची सोय असलेल्या मोजक्याच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. त्याची टक्केवारी केवळ एक ते दोन आहे.

मागील वर्षी एक ते १६ जून या कालावधीत २८.९ मिमी पाऊस झाला होता. त्या कालावधीत कापसाच्या ७५० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या. मात्र यंदा बिकट परिस्थिती आहे.

खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली. बँक, सहकारी संस्था, नातेवाइकांकडून उधार उसने घेऊन शेतकऱ्यांनी खते, बी-बियाणे विकत घेतली.

सगळी कामे आटोपून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. मृग नक्षत्रात पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांनी होती. मात्र, मृग नक्षत्र पूर्णतः कोरडा गेला. मात्र अजूनही पाऊस झाला नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत.

जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र चार लाख ९० हजार ४५० हेक्टर इतके आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, धान, सोयाबीन आणि तूर ही पिके घेतली जातात. कापसाच्या दरात घसरण झाली असली, तरी नगदी पिके अशी ओळख असलेल्या कापसाकडेच यंदाही शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. एक लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्र कापसाच्या लागवडीचे आहे.

कापसापाठोपाठ धानाचे पीकही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. धानाला सगळ्यात जास्त पाणी लागते. एक लाख ४६ हजार हेक्टर क्षेत्र धानाचे आहे. सोयाबीन ७४ हजार ३०० हेक्टर क्षेत्र, तर तुरीची ३४ हजार ७०० हेक्टर क्षेत्र आहे.

साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होते. मात्र जून महिन्याचे वीस दिवस उलटून गेले तरी पावसाला अजूनही सुरुवात झाली नाही. पावसाअभावी जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या असून, शेतकरी चिंतातूर आहे.

पेरणीची घाई नको

चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही पावसाला सुरुवात झाली नाही. ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. त्याआधी पेरणी केल्यास दुबारपेरणीचा धोका आहे. पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT