Swapnil Shinde
मे महिन्यात अनेक गावातील विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागतेय.
त्यामुळे टंचाईग्रस्त भागात शासनाकडून टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
राज्यातील ३ हजार २४६ गावं आणि वाड्यांवर सध्या एकूण ४४८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
राज्यात पाणीटंचाईची सर्वाधिक भीषणता विदर्भात दिसून येत आहे. या विभागातील ९५५ गावात टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
तर राज्यात सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे जळगाव जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात सुमारे ५५६ गावांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत आहे.
राज्यात कायम दुष्काळी म्हणून ओळखला जाणाऱ्या मराठवाड्यात यंदा पाण्याची बरी स्थिती आहे. पण कोकणात पाणी टंचाई तीव्र झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. या जिल्ह्यात एकही गावात पाणी टंचाई जाणवत नाही.