Women Self Help Group  Agrowon
ॲग्रो विशेष

Women Empowerment : चाळीस महिलांची १० दिवसांत पावणेदोन लाखांची कमाई

Women Self Help Group : गटातील सदस्य महिलांचा पुढील कार्यासाठी उत्साह वाढावा, या साठी कौतुक सोहळा झाला. या वेळी विक्री रकमेचे धनादेश वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Team Agrowon

Beed News : नक्षत्रा महिला गटाच्या ६ गावांतील ४० महिलांना विक्रीतून १० दिवसांत १ लाख ७५ हजार रुपये मिळाले. गटातील सदस्य महिलांचा पुढील कार्यासाठी उत्साह वाढावा, या साठी कौतुक सोहळा झाला. या वेळी विक्री रकमेचे धनादेश वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

नक्षत्रा महिला गटाद्वारे खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई येथे ग्रामीण महिला उद्योजिका कौतुक सोहळा झाला. या वेळी मंचावर दीनदयाल शोध संस्थान बीडचे प्रकल्प प्रमुख, डॉ. उपेंद्र कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते अक्षय मुंदडा, गट विकास अधिकारी समृद्धी दिवाने-काळे, सामाजिक कार्यकर्त्या संध्या कुलकर्णी, दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर उपस्थित होते.

गटाच्या अध्यक्षा उमा दीक्षित म्हणाल्या, ‘‘२०२३ हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरे होत आहे. दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्रामार्फत ज्वारी व बाजरी मूल्यवर्धित उत्पादने, शेवगा पावडर, दिवाळीसाठी गोमय पणत्या तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. ग्रामीण महिला कामात कुशल आणि खूप मेहनती आहेत. त्यांनी केलेल्या उत्पादनामध्ये चांगल्या गुणवत्तेसह भारतीय संस्कृतीची झलक दिसून येते.

नक्षत्रा महिला गटातील सदस्यांनी दिवाळीनिमित्त भरडधान्याचे मूल्यवर्धित पदार्थ ज्वारी-शेव, बाजरी-कापण्या, मिलेट-मिक्स, खारवड्या व ज्यूट बॅग तयार करून ‘दीपावली गिफ्ट कीट’ उत्पादित केल्या. पुणे, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बंगलोर, अंबाजोगाई व मुंबई येथे ५०० किटची विक्री केली. त्यातून महिलांना आर्थिक मिळकत प्राप्त झाली.’’

मुंदडा म्हणाले, ‘‘महिला गटाद्वारे मोठ्या प्रमाणावर पदार्थाचे उत्पादन करून मोठी बाजारपेठ मिळू शकते. यासारखे अभिनव प्रयोग दरवर्षी करावेत.’’ समृद्धी दिवाने-काळे, संध्या कुलकर्णी, गटाच्या सदस्या पुनम पत्की, शास्त्रज्ञ रोहिणी भरड, डॉ. अनघा पाठक, प्रतिभा देवळे, विजयश्री शेवतेकर व लक्ष्मी बोरा उपस्थित होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT