Wardha News : मागील हंगामात अवकाळी पावसामुळे संत्रा व मोसंबी बागांना मोठा फटका बसला. फुलधारणेनंतर झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ झाली. या पार्श्वभूमीवर बाधित क्षेत्रासाठी शासनाने १२ कोटी ३८ लाख १९ हजार ३०० रुपयांचा निधी मंजूर केल्याचे जाहीर केले. मात्र प्रत्यक्ष वाटपात केवळ सुमारे ६ कोटी रुपयांचे झाल्याचा आरोप आहे..कारंजा घाडगे तालुक्यातील एकूण ४ हजार ५०६.२८ हेक्टर क्षेत्र फळगळ व नुकसानीमुळे बाधित झाले होते. या क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर २२,५०० रुपये मदत मंजूर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. त्यानुसार एकूण १२ कोटी ३८ लाख १९ हजार ३०० रुपयांची तरतूद करण्यात आली होती..Subsidy Delay: दोन हजार कोटींचे अनुदान रखडविले.मात्र महसूल विभागाकडून अनुदान वितरण करताना अनेक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर केवळ १२,५०० ते १३,००० रुपयेच खात्यावर जमा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे उर्वरित ६ कोटी रुपयांच्या निधीचे काय झाले, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत..दरम्यान, आमदार सुमित वानखेडे यांनी हिवाळी अधिवेशनातही संत्रा उत्पादकांच्या नुकसानीचा प्रश्न उपस्थित केला होता. आष्टी तालुका संत्रा व मोसंबी उत्पादक कृती समितीने अनुदान १०० टक्के देण्याची मागणी करत तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना.Farmer Subsidy Delay: मंजुरीतील विलंबामुळे अनुदानात अडचणी.लेखी निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांच्या मते, अवकाळी पावसामुळे फुलधारणा नष्ट होऊन उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट झाली. परिणामी बागायती खर्च वसूल होणेही कठीण झाले आहे. अशा स्थितीत जाहीर केलेली मदत पूर्णपणे न मिळाल्यास आर्थिक संकट अधिक गडद होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे..चौकशीची मागणीअनुदानातील उर्वरित रकमेबाबत उच्चस्तरीय चौकशी करून संपूर्ण मंजूर निधी तातडीने वितरित करावा, अशी मागणी उत्पादकांकडून होत आहे. महसूल व कृषी विभागाने याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.