Women Empowerment : महिलांनी उद्योगातून आर्थिक सक्षम व्हावे

Woman Farmer : ‘उमेद’अंतर्गत स्थापन झालेल्या महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून महिलांनी वेगवेगळे उद्योग व उपक्रम राबवून आर्थिक सक्षम व्हावे, असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी व्यक्त केले.
Woman empowerment
Woman empowermentAgrowon
Published on
Updated on

Solapur News : ‘उमेद’अंतर्गत स्थापन झालेल्या महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून महिलांनी वेगवेगळे उद्योग व उपक्रम राबवून आर्थिक सक्षम व्हावे, असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी व्यक्त केले.

‘उमेद’अंतर्गत स्थापन झालेल्या महिला शेतकरी कंपन्यांना मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे बोलत होत्या. या बैठकी दरम्यान सुरुवातीला पंढरपूर, मंगळवेढा आणि माढा तालुक्यातील प्रती तालुका एक प्रमाणे महिला शेतकरी कंपन्यांना तांत्रिक साहाय्य करण्यासाठी विना मोबदला सहमती दर्शविली.

त्यानुसार श्री. विठ्ठल रुक्मिणी महिला शेतकरी कंपनी, पंढरपूर, माढेश्वरी महिला शेतकरी कंपनी, माढा आणि कृषी रुक्मिणी महिला शेतकरी कंपनी, मंगळवेढा या महिला कंपन्यांचा टेक्नोसर्व्ह संस्थेबरोबर सामंजस्य करार करण्यात आला.

विशिष्ट पिकांच्या उपक्रमासाठी तांत्रिक साहाय्य करणे, इत्यादी मार्गदर्शन संस्थेद्वारा विनामूल्य केले जाणार आहे. पुढील सहा महिन्यांत प्रत्येक महिला कंपनीची उलाढाल १० लाख पार करेल, अशी अपेक्षाही आव्हाळे यांनी व्यक्त केली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Woman empowerment
Woman Farmer : ग्रामीण महिलांना प्रगतीची वाट दाखविणारी ‘ज्योती’

या वेळी प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, तालुका अभियान व्यवस्थापक अवधूत देशमुख, कुणाल पाटील व लिंगराज शरणार्थी टेक्नो संस्थेकडून चंद्रविर सिंघ, चंद्रशेखर चेस्कू तसेच तीनही महिला शेतकरी कंपन्यांच्या निवडक संचालिका उपस्थित होते.

Woman empowerment
Woman Empowerment : तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना...

१२ महिला शेतकरी कंपन्यांना, करणार तांत्रिक मार्गदर्शन

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत जिल्ह्यात आजअखेर एकूण १२ महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. ‘उमेद’अंतर्गत स्थापन झालेल्या महिला शेतकरी कंपन्या कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना तसेच स्मार्टअंतर्गत विविध उपप्रकल्पही राबवीत आहेत.

परंतु सदर कंपन्यांना उपप्रकल्प राबविण्यासाठी शेतकरी कंपनी चालविण्याबाबतचे तांत्रिक मार्गदर्शन, कच्च्या व पक्क्या मालासाठी बाजार जोडणी यासाठी मार्गदर्शन आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्याने संस्थेचा आणि महिला शेतकरी कंपन्यांदरम्यान करार करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com