Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : माजी आमदार शेतकऱ्‍यांसाठी गेले धावून

Agriculture News : सैनिक टाकळी येथे पाणंद रस्ता सुधार योजनेतून रस्त्यांना भराव निर्माण झाल्यामुळे रस्त्याची उंची वाढल्याने टाकळी येथील शंभर एकर पाण्‍यामध्ये गेली होती.

Team Agrowon

Kolhapur News : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील येथील शंभर एकर शेतामध्ये पावसाचे पाणी साचल्याने पिके कुजून गेली व इतर पिकेही घेता येईनात, अशी अवस्था निर्माण झाली होती. त्यामुळे येथील शेतकऱ्‍यांची कोंडी निर्माण झाली होती. माजी आमदार उल्हास पाटील हे शेतकऱ्‍यांसाठी धावून गेले आहेत. त्यांनी पाहणी करून ते पाणीउपसा करण्यासाठी खासगी यंत्रणा कार्यान्वित केल्याने शेतकऱ्‍यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सैनिक टाकळी येथे पाणंद रस्ता सुधार योजनेतून रस्त्यांना भराव निर्माण झाल्यामुळे रस्त्याची उंची वाढल्याने टाकळी येथील शंभर एकर पाण्‍यामध्ये गेली होती. अनेक वर्षे पावसाळ्यात पाणी साचत असल्याने पिके घेऊ शकत नव्हते. बऱ्‍याचदा याची तक्रार ग्रामपंचायतीपासून ते प्रशासनापर्यंत करूनही याची दखल घेतली नाही.

जमिनीतील पाणी बाहेर जाण्यासाठी मार्गच नसल्याने येथील शेतकऱ्‍यांची कोंडी झाली होती. शेतकरी हे पाणी काढण्यासाठी धडपडत होते. मात्र, प्रशासनाकडून मदत न मिळाल्यामुळे अंकुश माळगे, सुनील माने, अनिल पाटील, विनोद पाटील, दयानंद माळगे यांनी शिरोळ तालुक्याचे माजी आमदार उल्हास पाटील यांच्याकडे दाद मागितली.

त्यांनी सैनिक टाकळी येथे येऊन पाणी उपसा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा लावली. शेतकऱ्‍यांच्या शेतातील पाणी जात असून शेतीही रिकामी होत आहे. त्यामुळे चार गुंठे ते एक एकर जमीन असणाऱ्‍या शेतकऱ्‍यांना दिलासा मिळाला आहे.

शेतीमध्ये साठणाऱ्‍या पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी जमिनीखालून मोठी पाइपलाइन करून ती नदीत सोडणे अनिवार्य आहे. त्यासाठी मोठा निधी लागणार आहे. त्याची तरतूद शासनाकडून व्हायला हवी.
- उल्हास पाटील, माजी आमदार, शिरोळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT